वैद्यकीय क्षेत्रात सतत नवनवे तंत्रज्ञान निर्माण होऊन वापरात येत असते. त्यामुळे कृत्रिम अवयवांची रचनाही वेगळी होत आहे. वैज्ञानिकांनी कृत्रिम हात तयार करायचा नवा मार्ग शोधला आहे. हा हात वस्तूंना स्वत:च पाहू शकेल व त्याला सोयीचे होईल तसे त्यांना उचलेलही. या हातामध्ये कॅमेरा बसवलेला असेल व तो वस्तूची छायाचित्रे काढून ती इलेक्ट्रॉनिक मेंदूत पाठवून देईल. कृत्रिम अवयवांचे तज्ज्ञ डॉ. किएनोश नजरेपोर यांनी कृत्रिम हात बनवण्यासाठी नवी पद्धत अवलंबिली. आतापर्यंत डॉक्टर जुन्या बनावटीच्या कृत्रिम अवयवांचा वापर करायचे; परंतु आता काळ बदलला आहे. तंत्रज्ञान विकसित होण्याबरोबर वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्राचा वापर केला जात आहे. हा नवा कृत्रिम हात वस्तू उचलण्यास सक्षम असेल. उदा. पेन्सिलपासून ते सफरचंद ते बाटली पकडण्यापर्यंत प्रत्येक वस्तू काय आहे हे समजून तो त्यांना योग्य पद्धतीने उचलेल. या कृत्रिम हातामध्ये कॅमेरा बसवलेला असेल. तो आधी वस्तूचे छायाचित्र घेईल व इलेक्ट्रॉनिक मेंदूला पाठवून देईल. हा मेंदू हाताला मिली सेकंदांत आदेश देईल की वस्तूला कशा प्रकारचे उचलायचे आहे. वैज्ञानिकांनी या कॅमेऱ्यात ५०० पेक्षा जास्त वस्तूंची ७० वेगवेगळ्या पद्धतीच्या कोनातून छायाचित्रे काढून कॅमेऱ्याच्या मेमरीत बसवली आहेत. तो हात जेव्हा कोणत्याही वस्तूच्या समोर येतो त्यावेळी लगेचच मेमरीत संबंधित वस्तूच्या छायाचित्राचे स्मरण करून ती कशी उचलायची याची पद्धत समजून घेतो. सध्या हा हात चार प्रकारे वस्तूला उचलेल. उदा. कप, रिमोट, सफरचंद आणि पेन.
बघू शकणारा कृत्रिम मानवी हात येतोय
By admin | Published: May 06, 2017 1:06 AM