दुबई : एमिरेट््स विमान कंपनीच्या मस्कतहून दुबईला जाणाऱ्या विमानात सामान भरायच्या जागेत साप आढळून आल्याने, या विमानाचे उड्डाण सोमवारी रद्द करावे लागल्याचे वृत्त ‘खलीज टाइम्स’ने दिले.विमान कंपनीने एका निवेदनात यास दुजोरा देताना म्हटले की, प्रवासी विमानात येऊन बसण्याच्या आधी हा साप दिसला. अभियांत्रिकी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सापाला बाहेर काढण्यासाठी वेळ लागल्याने नियोजित उड्डाण रद्द करावे लागले. गेल्या नोव्हेंबरमध्ये एअरोमेक्सिको कंपनीच्या उत्तर मेक्सिकोतील टॉरेओ शहरातून मेक्सिको सिटीकडे येणाऱ्या विमानातही एक हिरवा गर्द साप प्रवाशांचे हातातील सामान ठेवण्याच्या वरच्या कप्प्यातून खाली लोंबताना दिसला होता. विमान खाली उतरेपर्यंत प्रवाशांनी ब्लँकेट््स टाकून त्या सापाला ‘स्थानबद्ध’ केले होते.
विमानात आढळला साप
By admin | Published: January 10, 2017 1:08 AM