VIDEO : घरात सात फूट लांब अजगर, रात्री दोन वाजता झोप उघडली तर उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:49 PM2021-09-28T12:49:28+5:302021-09-28T12:49:57+5:30
परिवारातील लोक अजगर बघून घाबरले होते. त्यानंतर परिवाराने १०० नंबर डायल करून याची सूचना दिली. पोलीस सर्पमित्र अभिजीत यादव यांना घेऊन गावात पोहोचली.
मध्य प्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यात सात फूट लांब अजगराला रेक्स्यू करण्यात आलं आहे. अजगर जिल्ह्यातील चंद्रपुरा स्थित विशाल पटेल यांच्या घरात शिरला होता. रविवारी आणि सोमवारी रात्री अजगरावर जेव्हा घरातील लोकांची नजर पडली तेव्हा परिसरात एकच खळबळ उडाली. गोंधळामुळे लोकांची झोप उडाली आणि लोक साप बघायला बाहेर आले.
परिवारातील लोक अजगर बघून घाबरले होते. त्यानंतर परिवाराने १०० नंबर डायल करून याची सूचना दिली. पोलीस सर्पमित्र अभिजीत यादव यांना घेऊन गावात पोहोचली. मोठ्या प्रयत्नांनंतर अभिजीत यांनी अजगर पकडला. अजगर इतका मोठा होता की, तो घरात झोपलेल्या व्यक्तीला गिळू शकला असता. कारण या भागात नेहमीच प्राणी गायब झाल्याच्या घटना घडतात.
सर्पमित्र अभिजीत यादवने सांगितलं की, अजगर फार चपळ होता. त्याची लांबी सात फूट होती. त्याला पकडून एका पिशवीत बंद केलं. त्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. रात्री अजगर तवा नगर जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आला.