Sex sport: जगभरात शेकडो प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा होत असतात ज्यात शेकडो स्पर्धक भाग घेतात. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल , हॉकी, बॅडमिंटन आणि बेसबॉलसारखे खेळ जुवळपास सगळ्यांना माहीत आहेत. पण स्वीडन या देशाने एका अशा खेळाची घोषणा केली आहे ज्याबाबत ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.
स्वीडन या देशाने अशा खेळाची घोषणा केली आहे ज्याबाबत काही देशात बोललं जात नाही तर काही देशांमध्ये याबाबत पूर्ण मोकळीक आहे. स्वीडन जगातील पहिला असा देश बनला आहे ज्याने सेक्सला एका खेळाच्या रूपात ओळख दिली. स्वीडन सेक्स चॅम्पियनशिपचं आयोजन करणार आहे.
रिपोर्टनुसार, स्वीडनने नुकतीच सेक्सला एका खेळाच्या रूपात रजिस्टर केलं आहे. यूरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचं आयोजन याच महिन्यात 6 जूनला केलं जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे यात एकूण 20 देशांचे लोक सहभागी होणार आहेत. त्यांनी रजिस्ट्रेशनही केलं आहे.
अनेक आठवडे चालणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. स्पर्धंकांकडे 45 मिनिटांचा वेळ असेल. ज्यातून ते मॅचसाठी स्वत:ला तयार करू शकतील. या स्पर्धेसाठी सहभागी लोकांमध्ये फार उत्साह आहे.
काय आहे स्पर्धेचे नियम?
यूरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये एकूण 16 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यात Seduction, ओरल सेक्स, पेनिट्रेशन, मसाज, अपीयरेंस, मोस्ट एक्टिव कपल या गोष्टींचा समावेश असेल. तसेच या स्पर्धेत कोण विनर असेल याचा निर्णय जज आणि प्रेक्षकांची मते करतील. यावेळी 30 टक्के मतं जज लोकांची तर 70 टक्के मतं प्रेक्षकांची असतील. या दोघांच्याही मतांचं मूल्यांकन केलं जाईल आणि विजेता घोषित केला जाईल.
तेच स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे प्रेसीडेंट ड्रैगन ब्राटिक म्हणाले की, सेक्सला एका खेळाच्या रूपात मान्यता दिल्याने लोकांची मानसिकता आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल. त्याशिवाय समाजात टाबू मानल्या जाणाऱ्या सेक्सबाबत लोकांमध्ये विचार बदलतील.