शाहजहांपूर - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे २ वर्षापूर्वी जेंडर बदलणाऱ्या शरद सिंहच्या घरी पाळणा हलला आहे. त्यांच्या पत्नीने खासगी हॉस्पिटलमध्ये एका मुलाला जन्म दिला. वडील बनल्यामुळे शरद सिंह खूप आनंदी आहेत. सध्या आई आणि मुलाची प्रकृती उत्तम आहे.
माहितीनुसार, काकोरी ट्रेन अॅक्शन शहीद ठाकूर रोशन सिंह यांची नात सरिता सिंह हिने २०२१-२२ या काळात जेंडर बदलीची प्रक्रिया सुरू केली होती. मुलगी असूनही ती मुलासारखी वागत होती. त्यात लखनौमधील हार्मोन थेरेपी केल्यानतर तिच्या चेहऱ्यावर दाढी आली. आवाजही पुरुषासारखा भक्कम झाला होता. २०२३ च्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील इंदूर येथे सर्जरी करून तिने जेंडर बदललं. २७ जून २०२३ मध्ये तत्कालीन अधिकारी प्रताप सिंह यांनी त्यांना जेंडर बदलीचं प्रमाणपत्र शरद सिंह नावाने दिले होते.
त्यानंतर सरिता सिंहचा शरद सिंह बनल्यानंतर २३ नोव्हेंबर २०२३ ला पीलीभीत येथील सविता सिंह नावाच्या मुलीशी लग्न केले. बुधवारी प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर सविता सिंह यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. ज्याठिकाणी संध्याकाळी सविता यांनी एका बाळाला जन्म दिला. शरद आणि सविता लग्नाच्या आधीपासून एकमेकांना ओळखत होते.
दरम्यान, माझी पत्नी सविता सिंह हिने १०-१५ वर्षापूर्वी बघितलेले स्वप्न आज साकार झालं आहे. आमच्या कुटुंबाल २६ वर्षानी पुत्र जन्मला आहे. प्रत्येक जोडप्याला मुलाचं सुख मिळावं हे वाटते परंतु कठीण परिस्थितीतून मला आज बाप होण्याचा आनंद मिळाला आहे. माझ्या आयुष्याील ही सर्वात मोठी गोष्ट आहे. शरद सिंह सध्या विकासखंडच्या ददरौल येथे प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात.