बॉलीवूडच्या चित्रपटात आपल्याला अनेक प्रकारे इंग्रजी ऐकायला मिळत असते. ज्याप्रमाणे आपण मराठी जशी वळेल तशी वळवत असतो. त्याच प्रमाणे इंग्रजी भाषा आपल्या हटके स्टाईलप्रमाणे बोलत असलेल्या एका आजीचा व्हिडीयो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.
अरूण बोथरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या आजीचा व्हिडीओ खूप पाहीला जातोय. पण अनेकांना असं म्हटलयं की यांचं इंग्लिश ऐकून शशी थरूर सुद्धा टाळ्या वाजवेल. आत्तापर्यंत या व्हिडीयोला १ लाख ७६ हजार व्यूज मिळाले आहेत. कॅप्शनमध्ये असं लिहिलयं की या आजीच्या इंग्रजी बोलण्याला तुम्ही किती मार्क्स द्याल. यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल ही आजी नेमकी कशाबद्दल इतक्या उत्साहीपणे बोलत आहे. तर जाणून घ्या. ( हे पण वाचा-एस्कलेटरचा ब्रश शूज स्वच्छ करण्यासाठी नसतो; जाणून घ्या त्यामागचं लॉजिक)