शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

...अन् तो म्हणाला, ‘मग प्रत्येकीशीच लग्न करू का?’; एक फोन लावला अन् सारेच बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 6:02 AM

भामट्याच्या प्रेमात पडली शिकली सवरली मुलगी

नरेश डोंगरे नागपूर - तिला गोड-गुलाबी स्वप्न दाखविणाऱ्या दिल्लीतील प्रियकराला रेल्वे पोलिसांनी फोन केला अन् तो असे काही बोलला की, या तरुणीच्या प्रेमाची नशाच उतरली. ती ठाण्यात हमसून हमसून रडली अन् प्रेमभंगाचे दु:ख घेऊन घरी परतली. आई-बाबांसह कुटुंबीयांचा विरोध झिडकारून विना लग्नाची ससुराल निघालेल्या तरुणीबाबतची ही रिअल स्टोरी बुधवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावर उघड झाली. 

सजनी (२५) अन् तिच्याच वयाचा साजन (दोघांचीही नावे काल्पनिक) वर्षभरापूर्वी राजस्थानमध्ये एका लग्नसमारंभात भेटले. त्यांची जवळीक वाढली अन् मोबाइल नंबरही एक्स्चेंज झाले. ते तासनतास एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. ती त्याच्या प्रेमात पडली. इकडे सजनीच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्याने ती बिथरली. तिचे आई-वडील यामुळे कमालीचे अस्वस्थ झाले. यातच, बुधवारी अचानक सजनी घरून निघाली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. कावरेबावरे झालेले कुटुंबीय रेल्वेस्थानकाकडे धावले. शोधाशोध केली. सजनी दिसत नव्हती. त्यामुळे ते रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचले. आईने दिलेल्या माहितीवरून सजनी दिल्लीला जाऊ शकते, असा अंदाज बांधून ठाणेदार मनीषा काशीद यांनी सहकाऱ्यांना शोध घेण्यासाठी पाठवले. त्यावेळी सजनी तिकीट काउंटरवर आढळली. 

तीन वेळा आला, तीस हजार हडपले बडी बडी बाते करून सजनीला गोड-गुलाबी स्वप्न दाखविणारा सोनू रिकामटेकडा अन् बोलबच्चन वृत्तीचा असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. तो तिला भेटण्यासाठी तीन वेळा नागपुरात आला होता. त्याने सजनीकडून ३० हजार रुपये हडपल्याचेही चाैकशीत पुढे आले आहे.  

फोन लावला अन् सारेच बदललेखातरजमा करण्यासाठी मनीषा काशीद यांनी साजनला फोन लावला. सजनी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी निघाली आहे. तू तयार आहे का, असा त्याला थेट सवाल केला. स्पीकर सुरू आहे, सजनी आणि आम्ही सर्व ऐकत आहोत, हेदेखील सांगितले. त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. ‘मी तिला बोलवलेच नाही. सजनीसारख्याच माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. मी का प्रत्येकीशी लग्न करू का,’ असा उलट सवालही त्याने केला. ते ऐकून सजनी सैरभैर झाली. हमसून हमसून रडली. तिला शांत करत पोलिसांनी तिचे समुपदेशन केले.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट