पाकिस्तान प्रमाणेत बांग्लादेशमध्येही हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना निशाणा बनवलं जातं. पण तरीही येथील एक प्राचीन शिव मंदीर लोकांच्या श्रद्धेंचं केंद्र बनलं आहे. दूरदूरून लोक इथे भगवान शिवाच्या दर्शनासाठी येतात. या प्राचीन मंदिरात सर्वात खास बाब म्हणजे इथे नेहमीच अग्नी पेटत असते, या अग्नीने वैज्ञानिकांनाही हैराण केलं आहे.
बांग्लादेश हिंदू यूनिटी काउंसिलने मंगळवारी जगभरातील लोकांसाठी आश्चर्याचं केंद्र बनलेल्या या शिव मंदिराचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'अग्नीकुंड महादेव मंदिरा'ची माहिती देताना परिषदेने सांगितलं की, 'अग्नीकुंड महादेव मंदिर. हे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. जे चिट्टागांवात आहे. या मंदिरात आगीची एक ज्वाळा नेहमीट पेटत असते'.
वैज्ञानिकही हैराण
परिषदेने पुढे लिहिले की, अजूनपर्यंत कोणतेही वैज्ञानिक या आगीचा स्त्रोत शोधू शकलेले नाहीत. शेअर करण्यात आलेल्या फोटोत अग्नीकुंड पेटलेला दिसत आहे. हे फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. काही लोकांनी विचारले की, मंदिराची डागडुजी करण्याची काही योजना आहे का? तर काहींनी शंका व्यक्त केली की, काही कट्टरपंथी या मंदिरांला नुकसान पोहोचवू शकतात.
इथेही आहेत विशाल मंदिरे
कंबोडियामध्येही अनेक हिंदू मंदिरे आहेत. इथे भगवान विष्णुचं एक प्राचीन मंदिर आहे. जे सर्वात मोठं मंदिर मानलं जातं. या मंदिराची स्थापना १२व्या शतकात कम्बुजचे राजा सूर्यवर्मा यांनी केली होती. या मंदिराची रूंदी ६५० फूट आणि लांबी अडीच मैल आहे. भारताबाबत सांगायचं तर तामिळनाडुतील तिरूवनमलाई जिल्ह्यात शिवाचं एक अनोखं मंदिर आहे. या मंदिराला अनामलार किंवा अरूणाचलेश्वर शिव मंदिर म्हटलं जातं.