आजकाल लहान मुले आणि मोबाईल, यांच्यात एक अतूट नातेच तयार झाल्याचे दिसते. ही मुले मोबाईलवर गेम खेळत आणि व्हिडीओ पाहत संपूर्ण दिवसही मोबाईलवर घालवू शकतात. काही मुले तर, मोबाईलमध्ये एढे मास्टर होतात, की ते पालकांच्या नकळतच काही तर धक्कादायक गोष्टी करून जातात. आई अथवा वडील मोबाईलवर काही काम करताना अथवा शॉपिंग करताना, ही मुले त्याच्याकडे लक्षपूर्वक लक्ष देऊन असतात आणि ते काय करत आहेत, हे समजून घेतात. यानंतर ही मुलेही तसेच काही तरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मग काही तरी विचित्र गोंधळ निर्माण होतो.
2 वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून ऑर्डर केले 31 चीजबर्गर -मुलांना मोबाईल आणि गॅजेट्सपासून दूर ठेवायला हवेत, कारण या उपकरणांमुळे मुले बिघडवू शकतात, असे तज्ज्ञ मंडळी सांगतात. आपल्याला एक दोन वर्षांचा मुलगा अयांश कुमार आठवतो, ज्याने न्यू जर्सीमध्ये आपल्या आईच्या फोनवरून तब्बल 2,000 डॉलरचे (1.4 लाख रुपये) फर्निचर ऑनलाईन ऑर्डर केले होते. आताही काहीसे असेच प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. टक्सासमध्ये एका 2 वर्षांच्या मुलाने आईच्या मोबाईलवरून तब्बल 31 चीजबर्गर ऑर्डर केल्याची घटना घडली आहे.
केवळ ऑर्डरच नाही, तर टीपसुद्धा दिली - अमेरिकेतील टेक्सासमध्ये, एका 2 वर्षाच्या मुलाने आपल्या आईच्या मोबाईलवरून मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून तब्ब्ल 31 चीजबर्गर ऑर्डर केले. एवडेच नाही, तर या मुलाने डिलिव्हरीसाठी 16 डॉलर सुमारे 1,200 रुपयांची टीपही दिली. केल्सी बुर्खाल्टर गोल्डन (Kelsey Burkhalter Golden) यांनी यासंदर्भात फेसबूकवर माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे, की त्यांचा मुलगा बॅरेटने डोरडॅश अॅपचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बर्गरची ऑर्डर दिली. या पोस्टसोबत संबंधित 2 वर्षांच्या मुलाचा फोटोही आहे. जो त्याने ऑर्डर केलेल्या चीजबर्गर्सच्या ढिगाऱ्याजवळ बसला आहे. ही ऑर्डरनंतर, रद्द करता आली नाही.
आईला वाटले, की मुलगा फोटो काढतोय - या मुलाच्या आईने पुढे लिहिले, 'माझ्याकडे मॅकडॉनल्ड्सचे 31 चीजबर्गर आहेत. कुणाची इच्छा आहे का? माझा 2 वर्षांचा मुलाग डोरडॅशवरून ऑर्डर करणे जाणतो.' केल्सी म्हणाल्या, की आपण आपल्या मुलाला मोबाईल वापरताना बघितले. पण, तो फोटो काढतोय, असे आपल्याला वाटले. ऑर्डरचे एकूण बील 61.58 डॉलर एवढे होते आणि यात या मुलाने 16 डॉलरची टीपही दिली होती. याच बरोबर, हे अॅप हाईड करणे आवश्यक आहे, कारण ते सुरक्षित नाही, असेही केल्सी यांनी म्हटले आहे.