अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यात मनुष्य प्राण्यांसोबतच जनावरांनाही मोठा फटका बसत आहे. अमेरिकेतील मोंटानामध्ये बर्फामुळे एका मांजरीची स्थिती फारच वाईट झाली होती. हा फोटो पाहून अनेकांना वाटलं असेल की, या मांजरीचा जीव गेला असेल. मात्र, सुदैवाने डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात यश मिळालं.
Dr. Jevok Clark आणि Dr. China Corum यांनी ही मांजर जिथे बर्फाखाली दाबली गेली होती, तेथून बर्फ बाजूला केला. यासाठी त्यांनी गरम पाण्याचा वापर केला. त्यानंतर तिला काही इंजेक्शन्स देण्यात आले. त्यानंतर तिचा ताप आणि थंडी कमी झाली.
अमेरिकेत सध्या जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सुदैवाने मांजरीला डॉक्टरांनी वेळीच रूग्णालयात नेल्याने तिचा जीव वाचू शकला. या मांजरीचे मालक तिला घरीही घेऊन गेले. पण ३ ते ४ तास ती शॉकिंग मोड होती. पण मांजरीचं नशीब चांगलं की, ती बचावली.