तुम्ही कधी विचार केलाय का? जर समजा तुम्ही ऑफिसमध्ये वेळेच्या दोन मिनिटं लवकर निघालात आणि तुमचा पगार कापला गेला तर काय होईल. होय ही वास्तविक घटना वाचून तुम्हीलाही प्रश्न पडेल. आपले ८ किंवा ९ तास पूर्ण होण्याच्या २ मिनिटं आधी लॉग आऊट करणं कोणता गुन्हा नाही. पण जपानच्या एका सरकारी कर्मचाऱ्याला ऑफिसमधून लवकर निघणं चांगलच अंगाशी आलं आहे. जगभरात अशी अनेक कार्यालयं आहेत जिथं काम संपल्यानंतर ऑफिसमधून जाण्यास परवागनी आहे. पण जपानच्या एका कर्मचाऱ्याला ऑफिसमधून २ मिनिटं लवकर निघाल्यामुळे आपला पगार गमावावा लागला आहे.
रिपोट्नुसार चिंबा प्रान्तातील फनाबाशी सिटी बोर्ड ऑफ एज्यूकेशनच्या स्फाफ मेंबरर्सना ऑफिसमधून लवकर निघाल्यामुळे पगार कापला जाण्याची शिक्षा मिळाली आहे. द सानकेई न्यूजच्या रिपोर्टनुसार व्यवस्थापनाकडून मे २०१९ आणि जानेवारी २०२१ मध्ये ३१६ लोकांच्या ऑफिसमधून लवकर निघण्याच्या प्रकारकडे दुर्लक्ष केलं होतं.
जबरदस्त! पठ्ठ्यानं लाकडापासून बनवली रॉयल एन्फिल्ड बुलेट; रियल बुलेटपेक्षा भारी लूक पाहून व्हाल अवाक्
त्यानंतर त्यांनी एक्झिट टाईमवर लक्ष दिल्यास दिसून आलं की, लोक चुकीची माहिती भरत आहेत. जेणेकरून ऑफिसमधून लवकरात लवकर बाहेर पडता येईल. ३१६ लोकांनी आपल्या कार्डवर एंट्री करत चुकीची माहिती भरली होती. वारंवार घडत असलेल्या या गैरप्रकाराची दखल घेत पगारातून १/१० भाग कपात करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.
Video : कमाल! नियम मोडणाऱ्यांना लांबूनच असं ओळखतात ट्रॅफिक पोलिस; पाहा व्हायरल व्हिडीओ
समोर आलेल्या माहितीनुसार पगात कपातीला वैतागून एका महिलेनं आपल्या लॉग आऊट वेळेच्या दोन मिनिटं आधी ऑफिसमधून निघाली कारण तिला बसही पकडायची होती. सोशल मीडियावर ही घटना तुफान व्हायरल होत असून शेकडो युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.