कोरोना व्हायरससोबत लोक आता जगण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. कारण कोरोनावर अजूनही औषध सापडलेलं नाही. लोक आता मास्क घालतात, अंतर ठेवतात आणि सतत हात धुतात. हेच उपाय आपल्याला सध्या कोरोनापासून वाचवू शकतात. अनेकांना कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करत आहेत.
आता हे सगळं कधीपर्यंत करावं लागेल याबाबत काहीच सांगता येणार नाही. कारण कोरोनावर वॅक्सीन अजून आली नाही. अशात एक कंपनी DirectlyApply या कंपनीने एका मॉडेलच्या माध्यमातून दाखवले की, जर असंच वर्क फ्रॉम असंच सुरू राहिलं तर लोक 25 वर्षात कसे दिसू लागतील.
DirectlyApply ही लंडनची कंपनी आहे. ज्यावर लोक नोकरी शोधत असतात. हे चित्र असेल अमेरिकेतील. कारण भारतात फार जास्त लोक वर्क फ्रॉम करत नाहीयेत. पण जेवढे लोक वर्क फ्रॉम करत आहेत. त्यांनी हे मॉडल समजून घेतलं पाहिजे. या मॉडलला कंपनीने Susan असं नाव दिलं आहे. जे 25 वर्षांनंतरची स्थिती दाखवतं.
डिजिटल आय स्ट्रेन, केसगळती, डार्क सर्कल, खराब पोश्चर आणि लठ्ठपणासारख्या समस्या वाढतील. तसेच दोन व्यक्तींमधील वाढत्या अंतराने लोकांमध्ये तणावाचं प्रमाणही वाढेल. जर तुम्ही 9 ते 5 चं विश्व सोडून काम करत असाल, म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करत असाल आणि लोकांशी संवाद साधत असाल तर समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही.
मुळात भारतात हे वर्क फ्रॉम कल्चर तेवढं प्रचलित नाहीये. पण परदेशात खासकरून अमेरिकेत वर्क फ्रॉम होम फार चालतं. आधीच या देशातील लोक लठ्ठपणाच्या समस्येने हैराण आहेत. अशात वर्क फ्रॉम होम ही कॉन्सेप्ट त्यांच्या समस्या अधिक वाढवत आहे. भारतात आता लॉकडाऊनमुळे काही मोजक्याच लोकांना वर्क फ्रॉम होम करावा लागतं आहे. त्यामुळे ते पुढील 25 वर्षांनी असे दिसणार नाही.
वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं
काय सांगता! हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं?