Old Photo Of British Diary: आपल्या सर्वांना माहित आहे की, भूतकाळ बहुतेक लोकांसाठी खूप क्लिष्ट असू शकतो. यापैकी काही गोष्टी नॉस्टॅल्जिया आणि काही आठवणी, भावना जागृत करू शकतात. पुरातन वास्तू आपल्याला भूतकाळाशी जोडल्याची भावना देतात आणि पूर्वीच्या काळात लोक कसे जगायचे, विचार कसे करायचे हे समजून घेण्यास मदत करू शकतात. अलीकडे, लेखिका इरा मुखोती यांनी बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या वैयक्तिक डायरीतील एक दस्तावेज शेअर केला आहे. जाणून घ्या काय होतं त्या दस्तावेजात...
वॉरन हेस्टिंग्जच्या वैयक्तिक डायरीतील कबाब रेसिपी
इरा यांनी कबाब रेसिपीचा (Kebab Recipe) जुना फोटो शेअर केला आहे. कबाबच्या रेसिपीचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी त्यासोबत एक छोटासा मेसेजही लिहिला आहे. फोटोमध्ये, एक हाताने लिहिलेली नोट आपण पाहू शकतो ज्यामध्ये कबाबसाठीचे लागणारे साहित्य, जसे की किसलेले मांस, लसूण, मिरची, अंड्यातील पिवळ बलक, मलई आणि बरेच काही लिहिले आहे. वॉरन हेस्टिंग्जनेही डिश बनवण्याच्या प्रक्रियेची नोंद केली आहे. जसे तुम्ही वॉरन हेस्टिंग्जच्या कबाब रेसिपीमध्ये लिहिलेले बघू शकता- "पाच किंवा सहा ग्लास पाण्यात कबाब चांगले मिसळा, सॉसपॅनमध्ये कोरडे होईपर्यंत उकळवा. दगडावर चांगले दळून घ्या. त्याचे केकसारखे आकार बनवा आणि बटर फ्राय करा. हे करताना पॅनला पदार्थ चिकटणार नाही याची काळजी घ्या," असे त्यात लिहिले आहे.
--
ट्विट सोशल मीडियावर व्हायरल
इराने ट्विटमध्ये पुढे म्हटले- "त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित होणार असतानाही, हेस्टिंग्ज जुलै १७८४ मध्ये लखनौमध्ये नवाब आसफ यांच्या सहवासात एन्जॉय करत होते, कबाब बनवायला शिकत होते. ब्रिटिश लायब्ररी, हेस्टिंग्जची वैयक्तिक डायरी पाहून हे समजू शकते." हा फोटो शेअर केल्यापासून, या ट्विटला आतापर्यंत एक लाख ७३ हजार व्ह्यूज आणि १४०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांना कबाब रेसिपीच्या या जुन्या नोटांबद्दल खूप रस होता. एका वापरकर्त्याने लिहिले, "ही कागदपत्रे उत्तम माहिती देणारी आहेत. त्यावर 'कबाब खेताई' लिहिलेले आहे का?" असेही एकाने लिहिले आहे.