Chinese Man Marathon: मॅरेथॉन धावण्याचा उद्देश फिटनेसला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य सुधारणे हा आहे. मॅरेथॉन धावणे सोपे नाही. यासाठी प्रशिक्षण आणि निरोगी जीवनशैलीप्रती वचनबद्धता आवश्यक आहे. जे मॅरेथॉन धावतात ते लोक आरोग्याबाबत सर्वात जागरूक मानले जातात. मात्र, 'अंकल चेन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिनी धावपटूने चेन-स्मोकिंग करताना मॅरेथॉन पूर्ण केली. त्यांचे मॅरेथॉनमध्ये धावतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
रिपोर्ट्सनुसार ४२ किलोमीटरची 'झिनजियांग मॅरेथॉन' चीनच्या जिआंदे शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जवळपास १ हजार धावपटू सहभागी झाले होते. त्याच ५० वर्षांची ही व्यक्तीही सहभागी झाली होती. मॅरेथॉन दरम्यान धावताना ते एका मागोमाग एक सिगरेटही ओढत होते.
३ तास २८ मिनिटांत मॅरेथॉन पूर्णमीडिया रिपोर्ट्सनुसार, ५० वर्षीय चेन यांनी ६ नोव्हेंबर रोजी चीनमधील जिआंदे येथे स्मोकिंग करत करतच ४२ किमीची मॅरेथॉन पूर्ण केली. स्पर्धेत भाग घेतलेल्या सुमारे १५०० धावपटूंपैकी ५७४ वे स्थान त्यांनी मिळवलं. त्यांनी तीन तास 28 मिनिटांत ही मॅरेथॉन पूर्ण केली. सिगारेट ओढत असतानाच त्यांनी हा कारनामा केला. त्यांचे सर्व फोटो सर्वप्रथम Weibo या चिनी सोशल मीडिया अॅपवर व्हायरल झाली, ज्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांनीही नंतर त्यांचे फिनिशिंग सर्टिफिकेट वाटून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला.