शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

बूटात लपवले १०० पेक्षा जास्त विषारी जिवंत कोळी; कारण वाचून तुम्हीही हादराल....

By manali.bagul | Published: November 03, 2020 4:22 PM

१०० पेक्षा जास्त  जीवंत घातक कोळ्यांना एका बूटामध्ये प्लास्टिकच्या लहान-लहान डब्ब्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं.

कोळीची टॅरेंटुला ही प्रजात खूप विषारी असते. फिलिपिन्स निनॉय एक्विनो इंटरनॅशनल एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी एका बूटांच्या बॉक्समधून हे जिवंत कोळी जप्त केले आहेत. कोळ्यांना लपवण्यासाठी  भामट्यांनी चांगलीच शक्कल लढवली होती. पण पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत.  १०० पेक्षा जास्त  जीवंत घातक कोळ्यांना एका बूटामध्ये प्लास्टिकच्या लहान-लहान डब्ब्यांमध्ये ठेवण्यात आलं होतं.

या बूटाच्या पार्सलच्या खराब पॅकिंगकडे लक्ष गेल्यावर अधिकाऱ्यांना संशय आला. म्हणून त्यांनी बूटांच्या पार्सलची पाहणी करायला सुरूवात केली. त्यानंतर बूटाच्या आत आढळलेले इतके सारे कोळी पाहून अधिकारी हैराण झाले. प्लास्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये  हे जिवंत कोळी बांधून ठेवण्यात आले आहेत. 

अधिकाऱ्यांनी हे सर्व टॅरेंटुला कोळी, डिपार्टमेंट ऑफ एनव्हायरमेंट अँड नॅच्युरल रिसोर्सेज वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग यूनिटला २९ ऑक्टोबर रोजी सोपवले आहेत. हे कोळी २८ ऑक्टोबरला जप्त केले होते. फिलिपिन्सच्या ब्युरो ऑफ कस्टम्सने हे टॅरेंटुला जप्त केले असून याचे फोटो आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे टॅरेंटुलाची जगभरात मोठी तस्करी केली जाते.

कोळ्यांचे प्रकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात  अठराशेपेक्षा जास्त प्रकारच्या कोळ्यांची नोंद झाली आहे. कोळ्यांची वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते. कोळ्यांमध्ये असंख्य प्रकार असून मुंगीच्या आकारापासून ते हाताच्या पंजाएवढे मोठे कोळी आपल्या परिसरात असतात. आपल्याकडे जायंट वूड स्पायडर अर्थात महाकाय कोळी जंगलात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आम्ही लग्नाळू! लग्नासाठी मुलगी हवी, संपूर्ण शहरात पठ्ठ्यानं लावले बॅनर्स; संपर्क करण्याचं आवाहन

तंबूसारखे, नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी, जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा, जाळे पूर्ण झाल्यावर विशिष्ट द्रवाने जाळ्यावर स्वाक्षरी करणारा कोळी असे विविध प्रकारचे कोळी आढळतात. परदेशांत कोळ्यांना पाळण्याची हौस लोकांना आहे. ऑनलाइन आणि काही दुकानांमध्येही कोळी विक्रीसाठी उपलब्ध असतात. ७५ हजार रुपये किलोंनी विकली जातेय भारतातील 'ही' दुर्मिळ चहापावडर, जगभरातील मागणीत वाढ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी