जगभरात सतत अशा घटना घडत असतात ज्याबाबत वाचल्यावर किंवा ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी उडी मारली तर खिडकीजवळ उभ्या असलेल्या फायर फायटरने त्या व्यक्तीला हवेतच पकडलं आणि त्याचा जीव (Firefighter snatches suicide Jumper) वाचवला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील लोकांची बोलती बंद झालं आहे. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ बघू शकता की बिल्डींगच्या छतावरून एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी उडी घेतो. बिल्डींगच्या मधल्या मजल्याच्या खिडकीतून काही बचावकर्मी वरच्या दिशेने बघत आहेत. जशी वरच्या व्यक्तीने उडी मारली फायर फायटरने चपळता दाखवत त्याला हवेतच खाली पडताना धरल. त्यानंतर त्याला लगेच खिडकीतून आत खेचलं. काही सेकंदाचा हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.
हा व्हिडीओ रेडिटवर पोस्ट करण्यात आला आहे आणि आतापर्यंत याला एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ बघितल्यावर शेकडो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'मला वाटतं तो फारच जोरात जमिनीवर पडला असता. पण त्याला फायर फायटरने वाचवलं'. एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिले की, 'मला समजत नाही की, फायर फायटरने त्या व्यक्तीला हवेतच कसं पकडलं'. अनेकांनी अशाच प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.