गुजरातमध्ये एका २३ वर्षीय विवाहित महिलेला पूर्ण गावासमोर आधी अपमानित करण्यात आलं. इतकंच नाही तर सर्वांसमोर तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिचे कपडेही फाडले. हे इतक्यावरच थांबलं नाही तर तिला पतीला खांद्यावर घेऊन फिरण्याची शिक्षाही देण्यात आली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ही घटना दाहोद जिल्ह्यातील आहे. असं सांगितलं जात आहे की, महिलेचे विवाहानंतरही एका दुसऱ्या पुरूषासोबत संबंध होते. ही महिला त्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. ती खाजौरी गावात राहणाऱ्या एका पुरूषासोबत पळून गेली होती. जेव्हा महिलेच्या पतीला आणि त्याच्या घरातील लोकांना हे समजलं तेव्हा ते तिला पकडून गावात घेऊन आले.
या सर्व प्रकारानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत महिलेने सांगितलं की, तिला गावात परत आणल्यावर मारहाण करण्यात आली. तिला काठीने मारण्यात आलं. तिचे कपडे फाडण्यात आले. गावातील लोाकांबाबत ती म्हणाली की, त्यांनीही तिला शिव्या दिल्या आणि धमक्याही दिल्या.
ही घटना ६ जुलैला लोकांसमोर आली. जेव्हा या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत आणि गावातील लोकांना विचारपूस करत आहेत. डीएसपी कानन देसाई म्हणाले की, याप्रकऱणी १९ लोकांवर आरोप आहेत. पोलिसांनी ११ लोकांना पकडलं आहे. सद्या महिलेचे मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे.