शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

सिम कार्ड्स, हत्यारांची सोय करा, स्फोटातल्या आरोपीची योगींकडे मागणी

By admin | Published: March 25, 2017 10:48 AM

2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - 2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी यामध्ये कोणताही रस नसल्याचं दाखवत त्याची हाकलपट्टी केली होती. सुनील जोशीने 2006 रोजी गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीत योगी आदित्यनाथ यांच्याकडे सिम कार्ड्स आणि हत्यारांची सोय करण्याची मागणी करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींची नोंद स्वामी असीमानंद यांच्या जबाबात आहे. कलम 164 अंतर्गत हा जबाब नोंदवण्यात आला होता, जो नंतर मागे घेण्यात आला. 
 
(अजमेर स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप)
 
अजमेर स्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद आणि भारत मोहन रतेश्वर उर्फ भारत भाई यांना नुकतंच जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष म्हणून मुक्त केलं आहे. दोघांनीही दंडाधिका-यांसमोर आपला जबाब नोंदवला होता. यामधून मिळालेल्या माहितीनुसार सुनील जोशी आणि भारत भाईने एप्रिल 2006 रोजी स्वामी असीमानंद यांच्या आदेशानुसार गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. स्वामी असीमानंद यांनी सुनील आणि भारतला आग्रा जाऊन स्थानिक आरएसएश नेता राजेश्वर सिंह यांनी भेट घेऊन योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा मार्ग मोकळा करण्यास सांगितलं होतं. 
 
सुनील आणि भारत सर्वात आधी आग्र्याला गेले. तिथे त्यांची भेट राजेश्वर यांच्यासोबत झाली. योगी आदित्यनाथ यांची भेट घडवून आणण्यासाठी राजेश्वर दोघांनाही घेऊन गोरखपूरला रवाना झाले. स्वामी असीमानंद यांनी दंडाधिका-यांसमोर नोंदवलेल्या जबाबात या गोष्टींची नोंद आहे. भारत भाई आणि स्वामी असीमानंद यांच्या म्हणण्यानुसार, योगी आदित्यनाथ यांनी चर्चेत कोणताच रस न दाखवत पुन्हा कधीतरी येण्यास सांगितलं. योगी आदित्यनाथ बोलले होते की, 'मी सध्या खूप व्यस्त असून वेळ घेऊन पुन्हा कधीतरी भेटा'.
 
यानंतर सुनील आणि भारतने गोरखपूर सोडलं आणि पुन्हा कधी योगी आदित्यनाथ यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. असीमानंद यांच्या जबाबानुसार सुनील जोशीने आपल्याला राजेश्वर किंवा योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोणतीच मदत मिळालं नसल्याचं 2006 मध्ये सांगितलं होतं. विशेष म्हणजे स्वामी असीमानंद यांनी युटर्न मारत आपण दबावात हे सर्व बोललो होतो असा दावा केला आहे.
 
अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं होतं. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
8 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायलायने स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. याच सुनावणीत भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. विशेष म्हणजे 2011 रोजी असीमानंद यांना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणणा-या एनआयएने कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं होतं. 
 
काय आहे अजमेर बॉम्बस्फोट प्रकरण
11 ऑक्टोबर 2007 रोजी अजमेर येथील प्रसिद्ध सुफी संत  मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाली आहे. दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ एकाच बॉम्बचा स्फोट झाला. 
 
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास  राजस्थान एटीएसने केला होता. या तपासादरम्यान एटीएसने 2010 साली  तीन आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2010 साली या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. मात्र  एप्रिल 2011 मध्ये गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे सोपवला. 
 
एनआयएने तपासाला सुरुवात केल्यानंतर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरतमोहनलाल रतेश्वर, भावेश अरविंदभाई पटेल, आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती.  या प्रकरणी एनआयएचे विशेष न्यायालय शनिवारी आपला निर्णय सुनावणार होते, पण प्रकरणाचे गांभीर्य पाहता साक्षीपुराव्यांच्या अभ्यासासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगत विशेष न्यायालयाने निकाल पुढे ढकलला होता.