China : लग्न हे एक पवित्र बंधन मानलं जातं. वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज असतात. पण सध्या एका वेगळ्याच लग्न पद्धतीची चर्चा रंगली आहे. इतर सामान्य लग्नाप्रमाणेच हेही लग्न असतं. पण हे लग्न केवळ एका दिवसासाठी असतं. यात नवरीला एक दिवसाची पत्नी बनवण्यासाठी पैसेही मिळतात. पुरूष हे असं लग्न करतात कारण त्यांना मृत्यूनंतर जे हवं ते मिळावं. चीनमध्ये सध्या अशा लग्नांची चर्चा सुरू आहे.
इथे लोक काही नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत एका दिवस चालणारं लग्न करतात. याला वन-डे-मॅरेजेस नाव देण्यात आलं आहे.साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, अशी लग्न चीनच्या हुबेई प्रांतात फार प्रचलित आहेत. इथे सिंगल पुरूष मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या कौटुंबिक कबरींमध्ये दफन होता यावं म्हणून करत आहेत. येथील काही भागांमध्ये अशी मान्यता आहे की, ज्या पुरूषाचं लग्न होत नाही, ते guanggun असतात. त्यांना पारिवारीक कबरींमध्ये दफन केलं जात नाही. सोबतच परिवारात अनेक पिढ्या पुरूष सिंगलच राहतात.
काय मिळतं असं करून?
अशी मान्यता आहे की, ज्या पुरूषांना कौटुंबिक कबरींमध्ये दफन करण्याची परवानगी असते, त्यांची देखरेख परिवाराची पुढील पीढी करते आणि ते कागदांच्या पैशांपासून इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. अशाप्रकारची लग्न करण्याचा वु नावाच्या महिलेचा बिझनेस आहे. ती सांगते की, तिच्या अनेक प्रोफेशनल नवरी आहेत.
किती घेतात पैसे?
वु पुरूषांना एक दिवसाच्या लग्नासाठी नवरी देण्याच्या बदल्यात 41 हजार रूपये घेते आणि त्यातून 11 हजार स्वत:कडे ठेवते. लग्नानंतर पुरूष आपल्या एक दिवसाच्या नवरीसोबत कौटुंबिक कबरेवर जातो, जेणेकरून त्यांच्या पूर्वजांना माहीत व्हावं की, तो विवाहित आहे.