गंमत करणं एखाद्याला किती महागात पडू शकतं हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. अनेकदा छोटीशी गंमत अनेकांच्या जीवावर बेतल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. अशीच एका व्यक्तीने केलेली गंमत काही लोकांच्या जीवावर बेतली असती. मात्र, दैव बलवत्तर म्हणून वेळीच सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे गंमती गमतीत एका परिवारातील 6 लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत. एका रिपोर्टनुसार, येथील एका परिवाराने मेथी समजून गांजाची भाजी बनवून खाल्ली होती. त्याने सगळेजण आजारी पडले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीने गंमत करण्याच्या उद्देशाने भाजी करण्यासाठी गांजा दिला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, मियागंज गावातील नवल किशोर नावाच्या एका व्यक्तीने गावातील ओमप्रकाशचा मुलगा नितेशला सूखी मेथी सांगत गांजा दिला. घरी जाऊन हा गांजा नितेशने त्याच्या वहिणीला दिला. वहिणीने सूखी मेथी समजून गांजाची भाजी केली. सगळ्यांनी मिळून म्हणजे ओमप्रकाश, नितेश, मनोज, कमलेश, पिंकी आणि आरती यांनी ही भाजी खाल्ली. काही वेळाने सर्वांची तब्येत बिघडली.
त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना डॉक्टरला बोलवण्यास सांगितले. पण काही वेळातच सगळेजण बेशुद्ध झाले. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. ज्यानंतर सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी कढईतील भाजी आणि काही शिल्लक गांजा ताब्यात घेतला. तसेच नवल किशोर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले.
बाबो! 'माझं सपनावर प्रेम आहे' सांगत लग्नाच्या 10 दिवसांनंतर पत्नीने पतीला सोडलं अन्....
धक्कादायक! डोक्यात घुसलेल्या चाकूसोबत तो रस्त्यावर फिरत होता, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...