जास्तीत जास्त वेळा असंच म्हटलं जातं की, महिला भांडण झालं की आपल्या अश्रूंना आपला शस्त्र बनवतात. पण हेही तितकंच खरं आहे की, कपलमध्ये भांडण झाल्यावर महिला लगेच रडतात आणि मग सगळा वादच मिटतो. यावर म्हटलं जातं की, पुरूष महिलांच्या अश्रूंसमोर कमजोर पडतो. पण हे सत्य नाहीये. उलट हे अश्रू असं हत्यार असतात ज्याबाबत पुरूष आणि महिला दोघांनाही माहीत नसतं.
केमिकल सिग्नल
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हैराण करणारी बाब समोर आली आहे. पीएलओएस बायोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, महिलांच्या अश्रूंचा वास पुरूषांच्या रागाला कमी करतो. इस्त्राईलमध्ये वीजमॅन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स द्वारे करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये आढळून आलं की, मनुष्यांच्या अश्रूंमध्ये एक केमिकल सिग्नल असतं जो आक्रामकतेशी संबंधित मेंदूच्या दोन्ही भागातील अॅक्टिविटी स्लो करतो. हा रिसर्च करणारे पीएचडी विद्यार्थी शनि एग्रोन म्हणाले की, जेव्हा रिसर्चमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांचा शोध घेण्यात आला तेव्हा सगळ्यात जास्त महिला समोर आल्या. कारण असं मानलं जातं की, त्या दैनंदिन जीवनात सगळ्यात जास्त रडतात.
अश्रूंमध्ये कमी असतात टेस्टेस्टोरॉन
वीजमॅन इन्स्टिट्यूटने लिहिलं की, आधीच्याही रिसर्चमध्ये आढळून आलं की, मादा उंदरांचे अश्रू नर उदरांमधील भांडण कमी करतात. इतकंच नाही नर उंदीर हे दुसऱ्या उंदरांचा हल्ला रोखण्यासाठी स्वत:वर स्वत:चे अश्रू लावतात. वैज्ञानिक म्हणाले की, इतर काही शोधांमधून असंही समोर आलं की, अश्रूंच्या वासामुळे टेस्टेस्टोरॉन कमी होतात. एग्रोन यानी न्यूज़वीकला सांगितलं की, अश्रूंचा वास घेतल्यानंतर पुरूषांमध्ये टेस्टेस्टोरॉनचं प्रमाण कमी होण्यामागच्या निष्कर्षांना पाहिल्यावर समजतं की, अश्रूंमुळे आक्रामकता कमी करतात. हाच प्रयोग उंदरांनंतर पुरूषांवर करण्यात आला तेव्हा रिझल्ट हैराण करणारा होता.
पुरूषांची सूड घेण्याची भावना कमी झाली
त्यांनी सांगितलं की, इथे पुरूषांना एक कॉम्प्युटर गेम खेळण्यास देण्यात आला. ज्याचा वापर इतर एग्रेशन स्टडीजमध्ये केला जातो. ज्यात खेळाडू पैसे जमा करतात, तर समोरचा खेळाडू त्यांच्याकडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करतो. स्टडीमध्ये आढळून आलं की, या गेमदरम्यान महिलांच्या अश्रूंचा वास घेतल्यावर पुरूषांची सूड घेण्याची ईच्छा 43.7 टक्के कमी झाली.
अशात अभ्यासकांनी 62 पुरूषांचा खोलवर अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळलं की, यातील चार लोकांना अश्रूंचा फरक पडला, पण त्याच्या वासाचा नाही. त्यांना एमआरआय मशीनसोबतही जोडण्यात आलं आणि दिसलं की अश्रूंचा वास घेतल्यावर मेंदूतील आक्रामकता कमी झाली.