Snake Bite On Neck : असं म्हणतात की, सापांसोबत खेळ करणं तुम्हाला जीवावर बेतू शकतं. जास्तीत जास्त लोकांना माहीत आहे की, जर विषारी सापाने दंश मारला तर काही मिनिटांमध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो. असं असूनही काही लोक सापांसोबत खेळ करतात. मोबाइल कॅमेराने सेल्फी घेण्याच्या वेडाने एका व्यक्तीचा जीव गेला. एका व्यक्तीने साप गळ्याला गुंडाळला. त्याने गमतीने साप पकडला आणि गळ्यात गुंडाळला. पण नंतर जसा त्याने गळ्यात साप काढण्याचा प्रयत्न केला सापाने त्याच्या मानेला दंश मारला.
सापासोबत सेल्फी घेण्याच्या क्रेझने आंध्र प्रदेशातील एका तरूणाचा जीव गेला. ही घटना पोत्तिसिरामुलु नेल्लोर जिल्ह्यातील कंडुकुर भागातील आहे. ज्यूसचं दुकान चालवणारा मणिकांत रेड्डीने सापासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि आपला जीव गमावून बसला. परिसरात एक साप निघाला तेव्हा एक गारोडी सापासोबत खेळत होता. तेव्हा मणिकांत रेड्डी तिथे गेला. त्याने गारोड्याकडून साप हाती घेतला आणि सेल्फी घेण्यासाठी साप गळ्यात गुंडाळला. जेव्हा तो साप गळ्यातून काढत होता तेव्हा सापाने त्याला मानेवर दंश मारला.
या घटनेनंतर स्थानिक लोकांनी त्याला ओंगोलेच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यातच त्याचा जीव गेला. पोलिसांनी याची नोंद केली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. यावरून हे समजतं की, गळ्यात साप गुंडाळण्याआधी याचा विचार केला पाहिजे की, तो हल्ला करेल किंवा नाही. अर्थात सापासोबत खेळ करू नये. सापाला बघताच अनेक लोक दूर पळतात आणि तुम्ही असं करत नसाल तर तुम्ही घाबरलं पाहिजे.