नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेकदा काही विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. यांना पाहून तुमच्या-माझ्यासारख्या सामान्यांना धक्का बसतो किंवा आपण चकीत होतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत गळ्यात खरेखुरे साप गुंडाळलेले लोक रस्त्याने फिरताना दिसत आहेत.
सापांना घेऊन रस्त्यावर उतरले लोकआयपीएस अधिकारी रुपिन शर्मा ट्विटरवर खूप अॅक्टीव्ह असतात. ते आपल्या अकाउंटवर अनेक व्हिडिओ अपलोड करत असतात. नुकतंच त्यांनी सापांच्या यात्रेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत लोक सापांना घेऊन रस्त्याने फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पण साप घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर थोडीही भीती दिसत नाहीये.
सापांसोबत मैत्रीसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत लोकांची सांपांसोबतची बॉन्डिंग दिसत आहे. यातील काहींनी सापाला गळ्यात गुंडाळलंय तर काहींनी हातात घेतलंय. सापं घेऊन येणाऱ्या लोकांना पासून परिसरातील लोक घाबरुन बाजूला सरकत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. पण, या व्हिडिओच्या कमेंटमध्ये काही युझर याला उत्तर प्रदेशातील तर काही लोक बिहारमधील असल्याचे सांगत आहेत.