न्यूयॉर्क - एका अब्जाधीश व्यावसायिकाची पत्नी तिच्या अनोळखी फॅनबरोबर डेटवर गेली. त्याबदल्यात या व्यावसायिकाच्या पत्नीने त्या अनोळखी व्यक्तीकडून सुमारे अडीच लाख रुपये आकारले. आता या अब्जाधीशाच्या पत्नीने यामागचं कारण सांगितलं आहे.
पेशाने मॉडेल असलेल्या मेरिसोल योट्टा हीचा विवाह २०२१ मध्ये अब्जाधीश व्यावसायिक बास्टियन योट्टा हिच्याशी झाला होता. मॉडेल मेरिसोल इन्स्टाग्रामवर अॅक्टिव असते. तिचे सुमारे पाच लाख फॉलोअर्स आहेत. तिने सांगितले की, सोशल मीडियाबाबत ती तिच्या पतीसोबत एक स्पर्धा करत आहे. कुणाचे अधिक फॅन्स आहेत आणि महिनाभरात सोशल मीडियावरून कोण अधिक कमाई करतो याबाबत या पती-पत्नीमध्ये स्पर्धा लागली. त्यानंतर या मॉडेलने एका फॅन्सकडून अडीच हजार रुपये घेऊन ती त्याच्यासोबत डेटवर गेली.
बास्टियन योट्टा खूप आलिशान जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. बास्टियन योट्टची कंपनी वेगवेगळ्या प्रकराच्या मशीन तयार करते. ज्यामध्ये वजन कमी करणारी MindSlimmin मशीनचासुद्धा समावेश आहे. Yotta Life नावाने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊं’ आहे. त्यावर तो आपले विविध फोटो पोस्ट करत आहे.
जर्मनीमध्ये राहत असताना बास्टिनला त्याच्या ग्लॅमरस लाईफमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे तो अमेरिकेत गेला. जर्मनीमध्ये लोक माझा मत्सर करू लागले होते. माझ्या लाईफस्टाईलवर शंका घेत होते. त्यामुळे मी अमेरिकेत गेलो, असे त्याने सांगितले.
बास्टियन योट्टाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक सुट्टीवर जातात. मात्र माझ्याकडे holilife आहे. कारण माझ्यासाठी प्रत्येक दिवस हॉलीडे आहे. मग मी दर संध्याकाळी ८ लाख रुपये खर्च होतात की १५ लाख याचा विचार मी करत नाही.