इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:51 PM2022-02-24T13:51:41+5:302022-02-24T14:20:29+5:30

हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर काही लोकांचे भलतेच काहीतरी सुरू आहे. या मुद्द्यावर लोक मजेदार मीम्स (Memes) शेअर करत आहेत. या हॅशटॅगमुळे ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला आहे.

social media flooded with Russia Ukraine memes | इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

इथे रशिया-युक्रेन युद्धाच्या तणावाखाली आणि सोशल मिडियावर नेटीझन्स 'अशी' उडवतायत खिल्ली

googlenewsNext

रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे (Russia-Ukraine War). राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी स्फोटांचे (Blast) आवाज ऐकू येत आहेत. यामध्ये कोणी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराही रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे. त्याच वेळी, युक्रेनवर रशियन हल्ल्यापासून ट्विटरवर #worldwar3, #RussiaUkraineConflict आणि #WWIII ट्रेंड करत आहेत.

मात्र, हे युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर काही लोकांचे भलतेच काहीतरी सुरू आहे. या मुद्द्यावर लोक मजेदार मीम्स (Memes) शेअर करत आहेत. या हॅशटॅगमुळे ट्विटरवर जोक्स आणि मीम्सचा पूर आला आहे. हे युद्ध टाळता येणार नाही, त्यामुळे युक्रेनवर लष्करी कारवाई करण्यात येत आहे, असे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे म्हणणे आहे.

युक्रेनियन बंदर शहर मारियुपोलजवळ स्फोटांचा आवाज ऐकू आला. स्फोटांच्या आवाजाने लोक प्रचंड घाबरले आहेत. ट्विटरवर यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यामध्ये शहराच्या वरून धुराचे लोट उठत असल्याचे पाहायला मिळत आहे. या युद्धाच्या उद्रेकामुळे जिथे तिसर्‍या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे, तिथेच सोशल मीडिया वापरणाऱ्यांना मजा वाटतेय. लोक #worldwar3, #RussiaUkraineConflict आणि #WWIII या हॅशटॅगसह सतत मजेदार मीम्स शेअर करत आहेत. तथापि, बरेच यूझर्स युक्रेनसाठी प्रार्थनादेखील करत आहेत.

युक्रेनचे निशस्त्रीकरण सुनिश्चित करण्यासाठी लष्करी कारवाईचे उद्दिष्ट असल्याचे रशियाचे अध्यक्ष म्हणाले. पुतिन म्हणाले, सर्व युक्रेनियन सैनिक जे आपले शस्त्र ठेवतील ते युद्धक्षेत्रातून सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील. मात्र, अद्याप या प्रकरणी अमेरिकेकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Web Title: social media flooded with Russia Ukraine memes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.