अमेरिका : यंदा अमेरिकेत पडलेल्या थंडीची चांगलीच चर्चा सुरू आहे. रोज नव-नवे फोटो आणि व्हिडीयो सोशल मीडियावर येत आहेत. तिकडचं तापमान शुन्याच्याही खाली गेल्याने थंडीचा विषय चर्चेचा ठरलाय. संपूर्ण प्रदेश बर्फाच्छादित झाल्याने लोकांना बाहेर पडणंही मुश्किल झालं आहे. पण तरीही संपूर्ण देशाला अवाक् करतील अशा एक एक घटना समोर येत आहेत. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, जो पाहून सगळेच अचंबित होतील. बर्फाच्छादित नदीत एक तरुण चक्क स्केटिंग करताना दिसतोय. या तरुणाची ही डेअरिंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालीय.
आणखी वाचा - VIDEO: थंडीमुळे तलावातील पाण्यासोबत मगरीही गोठल्या, व्हिडीओ व्हायरल
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकाच्या युटाहमधील पाईनव्यू धरणाजवळ हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हे धरण पूर्णपणे बर्फाने गोठलेलं आहे. बर्फाने गोठलेल्या धरणाजवळ जाणंच एक प्रकारचं डेअरिंगचं काम आहे, त्यामुळे तिथं जाऊन स्केटिंग करणं लांबच राहिलं. पण व्हिडिओत दिसलेल्या तरुणाने हे डेअरिंग लीलया पार पडलंय. हा व्हिडिओ शूट केला आहे जस्टिन मॅकफारलँड यांनी. ते म्हणतात की, ‘हा व्हिडिओ शूट करतानाच आम्हाला वाटलं होतं तो प्रचंड व्हायरल होईल. आम्ही व्हिडिओ अपलोड करताच चांगला प्रतिसाद मिळू लागला.’
पाहा व्हिडीयो -
पण असं डेअरिंग करणं घातक आहे. योग्य मार्गदर्शकांच्या निगराणीखालीच असे स्टंट्स केले जातात. या व्हिडिओत दिसणाऱ्या युवकानेही योग्य ती सगळी काळजी घेतली असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याने लाईफ जॅकेट परिधान केलेलं आहे, जे दोन स्क्रू ड्रायव्हरने बांधलेलं आहे. जर कदाचित काही आपत्ती आलीच असती तर लाईफ जॅकेटने आपोआप काम करणं सुरू केलं असतं. हे लाईफ जॅकेट जवळपास ४ इंच जाड असल्याने जर काही अघडीत घडलंच तर स्केटरला त्यातून काहीच धोका नव्हता.
आणखी वाचा - कॅनडात तापमान -४० अंश, उकळत्या पाण्याचं झालं बर्फात रुपांतर