मागील आठवड्यात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर भिषण अपघात झाला. कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईहून परत घेऊन येणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान शुक्रवारी रात्री मुसळधार पावसात केरळमधील कोळीकोड येथील करीपूर विमानतळावर उतरत असताना त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला. अजूनही या अपघातात जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना? IPL 2020चे वेळापत्रक व्हायरल
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात विमानांचं खतरनाक लँडींग पाहून कुणाच्याही मनात धडकी भरेल... पण, असे खतरनाक लँडींग होऊनही विमान दुर्घटना झालेली नाही. वैमानिकाला विमान सुरक्षित लँड करण्यात यश आल्याचं दिसून येत आहे. 2 मिनिटे 6 सेकंदाचा हा व्हिडीओ 35 मिनिटांत 10 हजारवेळा पाहिला गेला आहे.
पाहा व्हिडीओ...
IPL 2020ची टायटल स्पॉन्सरशिप 'पतंजली'ला मिळाली, तर कसा असेल लोगो? फोटो व्हायरल
बंगालमध्ये सुरक्षित आहे, यूपीत असते तर माझ्यासोबत वाईट झालं असतं; हसीन जहाँनं दाखल केली FIR