प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात काहीतरी मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत असतात. काही लोक जीवनात श्रीमंत असण्याला जास्त महत्व देतात आणि हे लोक आयुष्यभर केवळ पैसे कमावण्याच्याच मागे लागलेले असतात. पण जगात असेही लोक आहेत ज्यांचं नशीब इतकं चांगलं असतं की, पैसा स्वत:हून त्यांच्याकडे येतो. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं.
सामान्यपणे असं होतं की, जेव्हाही काही आनंदी गोष्ट घडते तेव्हा लोक याची माहिती सगळ्यात आधी आपल्या आई-वडिलांना देतात. पण एक व्यक्ती अशीही आहे जी अब्जो रूपयांच्या संपत्तीची मालक आहे, पण त्याने आपल्या आई-वडिलांना याबाबत कधीच सांगितलं नाही. जेव्हा कुणीतरी त्यांना हे सांगितलं तेव्हा त्याच्यावरही या व्यक्तीने केस दाखल केली.
ही घटना अमेरिकेतील आहे. इथे एका व्यक्तीने छोटी-मोठी नाहीतर 1.3 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय करन्सीनुसार 112 अब्जांपेक्षा जास्त रक्कम जिंकली. टॅक्स कापल्यानंतरही त्याच्याकडे अब्जो रूपये शिल्लक आहेत. पण त्याने हे त्याच्या परिवाराला सांगितलं नाही. त्यानेही बाब त्याच्या मुलाच्या आईला नक्की सांगितली. सोबतच त्याने महिलेसोबत एक नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंटही केलं. जेणेकरून तिने हे रहस्य कधीही कुणाला सांगू नये.
ज्याने सांगितलं त्याच्यावर केस
एग्रीमेंटमध्ये लिहिण्यात आलं की, तिने या व्यक्तीची जॅकपॉट जिंकल्याचीबाब 1 जून 2032 पर्यंत सीक्रेट ठेवेल. जोपर्यंत त्याची मुलगी मोठी होत नाही. जर तिने चुकून याबाबत कुणाला सांगितलं तर 24 तासांच्या आत याची माहिती तिने त्याला द्यावी. या व्यक्तीच्या वकिलाचं म्हणणं आहे की, एग्रीमेंटनंतरही महिलेने केवळ या व्यक्तीच्या आई-वडिलांनाच नाही तर बहीण आणि इतरही काही लोकांना याबाबत सांगितलं. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने सारा स्मिथ नावाच्या महिलेवर केस दाखल करत तिच्याकडे 83 लाख रूपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.