Doomsday bunkers: अमेरिकेच्या साऊथ डकोटा (South Dakota) मध्ये एक ‘डूम्सडे सिटी’ बनवण्यात आली आहे. इथे जगावर मोठं संकट आल्यावर राहण्याजोगे खास बंकर तयार करण्यात आले आहेत. हे बंकर इतके मजबूत आहे की, कोणत्या प्रलयकारी स्थितीचा सामना करू शकतात. या शहरातील बंकरांची बुकिंग सुरू आहे. जिथे तुम्हीही जागा बुक करू शकता. या शहरात जास्तीत जास्त 10 हजार लोक राहू शकतात. पण हे तयार करण्यामागे काय कारण आहे. हे आज तुम्हाला सांगणार आहोत.
कुठे आहे डूम्सडे सिटी?
द सनच्या रिपोर्टनुसार, डूम्सडे बंकर कम्युनिटी (Doomsday Bunker Community) मध्ये कथितपणे 575 बंकर आहेत. जे एखाद्या अशा स्थितीसाठी तयार करण्यात आले आहे जेव्हा जगाचा विनाश होणार असेल. साऊथ डकोटामध्ये ब्लॅक हिल्स माउंटेन रेंजमध्ये एका सैन्य तळ होतं. जे 18 मैलापर्यंत पसरलेलं होतं. ज्याचा वापर 1942 ते 1967 पर्यंत बॉम्ब आणि युद्ध साहित्य जमा करण्यासाठी केला जात होता. ही शहर इथेच बनलं आहे.
या डूम्सडे सिटीमध्ये बुकिंग सुरू आहे. बिझनेस एक्झीक्यूटिव डायरेक्टर दांते विसिनो (Dante Vicino) ने एका वेबसाइटला सांगितलं की, ‘विवोस (Vivos), ज्याला आता एक एपिक ह्यूमॅनिटेरियन सर्वाइवल प्रोजेक्ट (Epic Humanitarian Survival Project) मानलं जातं. हे ठिकाण कशाही आणि कधी घडणाऱ्या घटनांचा सामना करण्यासाठी पूर्ण तयार आहे.
ते म्हणाले की, आमचे मेंबर्स ना जास्त श्रीमंत लोक आहेत ना जास्त गरीब. ते असे आहेत जे वर्तमानातील ग्लोबल घटनांबाबत खोलवर माहिती ठेवतात आणि जबाबदारीची भावना ठेवतात. त्यांना संभावित प्रलयाच्या काळात आपल्या परिवारांची देखरेख आणि सुरक्षा करायची आहे. यासाठी लोक हे बंकर बुक करू शकतात.
एग्जीक्यूटिव डायरेक्टर दांते विसिनो यांनी हे शहर बनवण्यामागचं कारण विस्ताराने सांगितलं. ते म्हणाले की, ‘वर्तमान कोविड धोका, यूक्रेनी युद्ध आणि त्यानंतरच्या परिणामांना बघता या बंकरची मागणी वाढत आहे. लोकांना वाटतं रशिया ते चीन आणि मीडल ईस्ट पर्यंत तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं. अशात अशा स्थितीत लोकांना या जागेची गरज पडेल. जिथे ते सुरक्षित राहू शकतील.