स्पेनमधील माद्रीदमध्ये अशी एक घटना घडली. त्या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल. येथील रेल्वे स्टेशनवर एक महिला आपल्या मोबाईलमध्ये पाहत चालली असताना थेट रेल्वेच्या पटरीवर पडली आणि समोरून ट्रेन आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
या घटनेचा व्हिडीओ 24 ऑक्टोबर रोजी मेट्रो द माद्रीदने शेअर केला आहे. या व्हिडिओत पाहिल्यावर समजते की, एक महिला स्टेशनवर आपल्या मोबाईलमध्ये पाहत चालत आहे. तिला समोर प्लॅटफॉर्म संपल्याचे आले नाही आणि ती थेट रेल्वेच्या पटरीवर पडली. त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर ट्रेन आली.
उत्तरी माद्रीदच्या एस्ट्रेचो स्टेशनमध्ये ही घटना घडली. ही घटना घडली त्यावेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर इतर प्रवासी सुद्धा असल्याचे या व्हिडिओत दिसत आहेत. ज्यावेळी ही महिला पटरीवर पडली, त्यावेळी इतर प्रवाशी तिला वाचवण्यासाठी सरसावले. पण, त्याचवेळी ट्रेन आली. त्यानंतर पुढे काय घडले, हे या व्हिडीओत दाखविले नाही. मात्र, सीबीएस न्यूजच्या माहितीनुसार, मेट्रो द माद्रीदने म्हटले आहे की, या घटनेत महिला गंभीररित्या जखमी झाली नाही.
मेट्रो द माद्रीदने यासंबंधीचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "या घटनेत काहीही झाले नाही. प्रवासी ठीक आहे." दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत 30 हजारहून अधिक व्हूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडीओला अनेकांनी सुरक्षेबाबत प्रतिक्रियाही दिल्या आहे.