मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये राहणाऱ्या थेवामनोगरी मॅनिवेल या महिलेच्या खात्यात अचानक तब्बल ८१ कोटी रुपये आले. इतके पैसे बघून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. चुकून खात्यात आलेल्या पैशांतून तिने ११ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी केले. उर्वरीत पैसे मुलगी, बहिणीसह सहा जणांमध्ये वाटून घेतले. खरेतर सिंगापूरमधील एका क्रिप्टो कंपनीकडून महिलेला आठ हजार रुपये मिळणार होते.
सुमारे सात महिन्यांनंतर ऑडिट झाल्यावर कंपनीला चूक समजली. कंपनीने महिलेशी संपर्क साधला; पण, तिने दुर्लक्ष केले. आता कंपनीने न्यायालयात खटला दाखल केला असून कोर्टाने महिलेसह जतिंदर सिंग नावाच्या व्यक्तीला दोषी ठरवले, तो त्या सहा लोकांपैकी होता ज्यांना महिलेने पैसे वाटले. आता तिला घर विकून सर्व पैसे परत करावे लागतील, असे कोर्टाने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"