जवळपास दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला 'विकी डोनर' हा बॉलिवूड चित्रपट भारताबरोबरच परदेशातही चांगलाच गाजला होता. भारतातील अनेकांना हा चित्रपट पाहिल्यानंतरच स्पर्म डोनरसारख्या गोष्टी समजू शकल्या. या चित्रपटानंतर या विषयावर बरीच चर्चा सुरू झाली आणि स्पर्म डोनेट करणं हे एखाद्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतं हे लोकांना कळू लागलं. असाच एक प्रकार समोर आला आहे.
काइल गॉर्डी असं या व्यक्तीचं नाव आहे आणि तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहतो. डेली मेलच्या वृत्तानुसार, त्याने 2014 मध्ये पहिल्यांदा स्पर्म डोनेट केले होते. गेल्या 9 वर्षांपासून तो हे काम करत असून आतापर्यंत त्यांनी 4 डझनहून अधिक महिलांना आई होण्यासाठी मदत केली आहे. तो आत्तापर्यंत 57 मुलांचा बाप बनल्याचे दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
रहस्य केलं उघड
रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक रहस्य उघड केलं आहे. या व्यक्तीचं म्हणणे आहे की त्याचे स्पर्म वाया जाऊ नये म्हणून तो शारीरीक संबंध ठेवत नाही. तो म्हणाला की आता त्याला स्पर्म वाचवायचे आहे. तसेच काही प्रकारचे सेक्शुअल इन्फेक्शन टाळण्यासाठी तो शारीरीक संबंध ठेवत नाही.
जगभरातील चर्चेचा विषय
माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे मी जीवनशैलीकडे खूप लक्ष देण्यास सुरुवात केली आहे, असेही तो म्हणाला. काइल हा स्पर्म डोनेट केल्यामुळे जगभरात चर्चेचा विषय असला तरी अलीकडेच त्याने पुन्हा ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांचा दौरा केला आहे. तेथेही त्याने आपले स्पर्म तीन महिलांना डोनेट केले आहेत.
गेली 9 वर्षे करतोय काम
काइल गेल्या 9 वर्षांपासून हे काम करत आहे. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत सांगितले की, जे वडील बनण्याचा विचार करत आहेत त्यांनी चांगली झोप घ्यावी आणि तणावापासून स्वतःला दूर ठेवावे. एका रिपोर्टनुसार, काइल आतापर्यंत 57 मुलांचा जैविक पिता बनला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"