Sperm donor Story: २०१२ मध्ये आलेल्या आयुष्मान खुराणाच्या 'विकी डोनर' सिनेमातून लोकांना स्पर्म डोनेशनबाबत बरीच माहिती मिळाली होती. या बॉलिवूड सिनेमाने मनोरंजनासोबतच समाजाला एक मेसेजही दिला होता. आज आम्ही तुम्हाला एका अशाच विकी डोनरबाबत सांगणार आहोत जो १५ मुलांना पिता बनला आहे. स्पर्म डोनेशनचं काम त्याने घरातील लोकांच्या लपून केलं होतं आणि यामागचं कारणंही खास आहे. पण तो आता अशा अडचणीत सापडला आहे ज्याचा तो विचारही करू शकत नाही.
'द सन'च्या रिपोर्टनुसार, ३७ वर्षीय जेम्स मॅक आतापर्यंत स्पर्म डोनेट करून १५ मुलांचा वडील झाला आहे. तो समलैंगिक महिलांना स्पर्म डोनेट करतो आणि हे सगळं करत असताना त्याने ही कुटुंबियांपासून लपवून ठेवलं होतं. खास बाब म्हणजे तो एका खास प्रकारच्या जेनेटिक आजाराने ग्रस्त आहे ज्याला Fragile X syndrome (FXS) म्हटलं जातं.
या आजारात आयक्यू लेव्हल कमी होते. सोबतच मेंदूचा विकासही हळूवार होतो. वाईट बाब ही आहे की, या अनोख्या आजारावर काही उपचार नाहीत. मॅकच्या ओळखीचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा त्याने कोर्टात त्या ४ मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी अपील केली ज्यांचा तो बायोलॉजिकल पिता आहे. त्यांचं वय ३ वर्षापेक्षा कमी आहे.
डर्बीमधील न्यायाधीश लिवेन यांनी मॅकला याची परवानगी दिली नाही. सोबतच आदेश दिला की, इतर महिलांनीही त्याचं नाव स्पर्म डोनर म्हणून वापरू नये. त्यानंतर त्याने सोशल मीडियावरून स्पर्म डोनर म्हणून प्रचार केला. कारण त्याला वाटत होतं की, त्याने काहीही चुकीचं केलं नाही. उलट तो या महिलांची मदत करत आहे.
तो म्हणाला की, मी काही चुकीचं केलं नाही. या उलट मी या महिलांची मदत करून चांगलं काम करत आहे. मी या महिलांना मुलं दिली तरीही त्यांना माझं काही नाही. माझ्यावर त्यांनी वाईट आरोप लावले. पण एक दिवस सत्य समोर येईल, सध्या मी नाराज आहे आणि दु:खी आहे.
मॅकच्या आईने सांगितलं की, त्याला केवळ या मुलांच्या लाइफचा भाग व्हायचं आहे. ज्यांना त्याने जन्म दिला. पण कोर्टाने त्याची अपील नाकारली आहे आणि आता त्यांच्यासोबत लढत आहे. त्या म्हणाले की, तो फार साधा आहे आणि त्याचं मन साफ आहे. तो त्या समलैंगिक महिलांची मदत करत आहे ज्या आई बनण्याचं स्वप्न बघत आहेत. पण इकट्या त्या हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. जोपर्यंत मला समजतं की, तो या सर्व्हिससाठी काहीच फी घेत नाही.
स्पर्म डोनेशनआधी मॅकने एक अॅग्रीमेंट साइन केलं होतं ज्यानुसार, तो कोणत्याही मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण नंतर त्याने काही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी कोर्टात अपील केलं होतं. मात्र, या तीन मुलांच्या आईने नंतर विरोध केला आणि कोर्टात आपल्या प्रायव्हसीचा हवाला देत मॅकची मागणी फेटाळण्याची विनंती केली.