शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'या' देशात जल्लाद होण्यासाठी आतुर झालेत लोक, दोन पदांसाठी इतक्या लोकांनी केले अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 11:48 AM

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो.

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपण बघितले असेल की, तुरूंगात एखाद्या व्यक्तीला फाशी देण्यासाठी एक जल्लाद असतो. उंच धिप्पाड दिसणार असा हा व्यक्ती असतो. अनेकांना प्रश्नही पडत असेल की, यांची भरती कशी केली जाते? कारण अशाप्रकारची नोकरी करणे कुणालाही आवडणार नाही. तसंच हे काम काही इतर कामांसारखंही किंवा सोपं नसतं. 

एका जिवंत व्यक्तीला फासावर लटकवण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये हिंमतीचीही गरज असते. पण श्रीलंकेत यावरून एक उलट चित्र बघायला मिळालं आहे. इथे काही लोक जल्लाद होण्यासाठी आतुर झाले आहेत. इथे जल्लादच्या दोन पदांसाठी नोकरी आहे. यासाठी तब्बल १०० लोकांनी अर्ज केला आहे. ज्यात अमेरिकेतीलही एका नागरिकाचा समावेश आहे. 

श्रीलंकन सरकारला मादक पदार्थांच्या तस्करांना फासावर लटकवायचं आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच घोषणा केली होती  की, पुढील दोन महिन्याच्या आत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोषींना फासावर लटकवतील. श्रीलंकेमध्ये २००४ मध्ये बलात्का, मादक पदार्थांची तस्करी आणि हत्या यांना मोठा गुन्हा मानला जातो. पण यासाठी शिक्षा म्हणून केवळ जन्मठेपच दिली जाते. तसं या देशात फाशी देणे कायद्याने वैध आहे. पण १९७६ पासून आतापर्यंत इथे कुणालाच फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही.  

श्रीलंकेच्या न्याय आणि कारागृह सुधार मंत्रालयाने घोषणा केली आहे की, सुरक्षा कारणांमुळे पदासाठी निवडण्यात आलेल्या लोकांची नावे आणि त्यांच्या मुलाखतीच्या तारखेची घोषणा केली जाणार नाही. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी ही होती. श्रीलंकेच्या न्याय मंत्रालयाने आधीच घोषणा केली होती की, मादक पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ४८ लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील ३० लोकांनी पुढे अपील केलं आहे. त्यामुळे उरलेल्या १८ दोषींना फाशी देण्यात येणार आहे. 

श्रीलंकेत आधी एक जल्लाद होता, पण त्याने काही कारणांमुळे २०१४ मध्ये राजीनामा दिली होता. त्यानंतर दुसऱ्या एका जल्लादाला नोकरीवर ठेवण्यात आलं होतं. पण तो सुद्धा हजर झाला नाही. सध्या इथे या पदासाठी जागा रिक्त आहे. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाjobनोकरी