तुम्ही ट्रेनमधून अनेकदा प्रवास केला असेल. या प्रवासादरम्यान तुम्ही पाहिलं असेलच की, रेल्वे रुळावर खडी टाकलेली असते. शेवटी, या खडीचा रेल्वे धावण्याशी काय संबंध आहे, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जर याबद्दल तुम्हाला माहित नसेल तर आपण याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ.
रेल्वे अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखादी ट्रेन रुळावरून जास्त वेगानं धावते तेव्हा त्यामुळे खूप आवाज आणि कंपन होतं. हा कंपन आणि आवाज कमी करण्यासाठी ट्रॅकवर खडी टाकली जाते. या खडीला बॅलेस्ट असंही म्हणतात. ते आवाज आणि कंपन कमी करकतात, त्यामुळे ट्रेनमध्ये बसलेले आणि बाहेर उभे असलेल्या लोकांना त्रास होत नाही.
घाणीचा ढीग साचत नाहीमोठ्या रेल्वे स्थानकांवर जेव्हा एखादी गाडी बराच वेळ थांबते तेव्हा त्यामध्ये बसलेल्या लोकांकडून स्वच्छतागृहाचा वापर केल्यामुळे खाली रुळावर घाण पडत राहते. अशा स्थितीत रुळावर पडलेली खडी ते शोषून घेते. ती खडी रुळावर नसती तर तेथे घाणीचे ढीग साचून नागरिकांना एक मिनिटही उभं राहणं कठीण होईल.
काँक्रिटचे स्लीपर्स धसत नाहीतरेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रुळांसाठी काँक्रीटचे स्लीपर लावले जातात. ट्रॅकवरच्या खडीची यासाठीही खूप मदत होते. स्लीपर्समधील अंतर कमी जास्त होण्यापासून ते बचाव करतात. तसं न केल्यास ट्रेन रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडू शकते. ही खडी माती धसण्यापासूनही वाचवतात. तसंच रुळावर झुडुपं वाढण्यास प्रतिबंध करतात.