नवी दिल्ली - हुंडा देणं आणि घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही देशातील अनेक खेड्य़ापाड्यात अशा प्रथा-परंपरा या सुरूच आहेत. हुंड्यामध्ये साधारणं लाखो रुपये, सोन्या-चांदीचे भरपूर दागिने, नव्या कोऱ्या गाड्या अथवा मौल्यवान वस्तू या हमखास मागितल्या जातात. मात्र तुम्हाला जर कोणी सोनं, चांदीच्या ऐवजी हुंड्यात तब्बल 21 विषारी साप दिल्याचं सांगितलं. तर तुमचा सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. मध्य प्रदेशच्या एका गावात ही अजब परंपरा आजही सुरू आहे. सासरी जाणाऱ्या लेकीला हुंडा म्हणून विषारी साप दिले जातात.
मुलीला सासरी पाठवताना वडिलांना 21 विषारी साप द्यावे लागतात. हे साप इतके विषारी असतात की जर त्यांनी एखाद्या व्यक्तीला दंश केला तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मध्य प्रदेशमधील एका समाजात आजही ही परंपरा सुरू आहे. जर असं केलं नाही तर मुलीच्या आयुष्यात दु:ख येऊ शकतं असं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरेया समाजात ही प्रथा आगे. या समाजातील मुली लग्न करून सासरी जाताना त्यांना तब्बल 21 विषारी साप दिले जातात. हुंडा म्हणून दिले जाणारे साप हे गहुआ आणि डोमी प्रजातीचे असून अत्यंत विषारी असतात.
विशेष म्हणजे विषारी साप पकडण्याची जबाबदारी ही ज्या मुलीचं लग्न होणार आहे तिच्या वडिलांची असते. मुलीचं लग्न ठरल्यानंतर तिचे वडील साप पकडण्याची तयारी करतात. जर साप दिले नाहीत तर मुलीचं लग्न मोडू शकतं अथवा अप्रिय घटना घडू शकतात असं म्हटलं जातं. गौरेया समाजातील लोकं हे साप पकडण्याचंच काम करतात. सापांचा खेळ दाखवून किंवा त्याचं विष विकून हे लोक पैसे कमवतात. वनविभागाने या लोकांमध्ये सापाबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तरी देखील सध्या ही प्रथा सुरूच आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना नाही हे सिद्ध करण्यासाठी एका व्यक्तीने चक्का एटीएम कॅश मशीन (ATM Cash Machines) चाटल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून सर्वच जण हैराण झाले आहेत. अमेरिकेत हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह स्ट्रीम दरम्यान एटीएम मशीन चाटतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. फेसबुकवर एका युजरने हा व्हिडीओ पाहिल्यावर दक्षिण यॉर्कशायर पोलिसांना याची माहिती दिली. तसेच त्या युजरने याआधी ही अशीच घटना घडल्याचा दावा केला आहे. तसेच एटीएम चाटणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्यांदा ते चाटलं असून त्याला या कृतीतून कोरोना नाही हे सिद्ध करायचं असल्याचं म्हटलं जात आहे. मशीन चाटतानाचा हा व्हिडीओ सध्या फेसबुकवरून हटवण्यात आला आहे. दक्षिण यॉर्कशायर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.