शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

स्वच्छतेसाठी घराघरात वापरल्या जाणाऱ्या डेटॉलचा इतिहास माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 10:38 AM

जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं. 

डेटॉल हे नाव कुणाला माहीत नाही असं क्वचितच कुणी सापडेल. सध्या कोरोनामुळे वेगवेगळ्या प्रॉडक्टसोबत डेटॉलही गायब झाल्याचं बघायला मिळत आहे. जेव्हा कोरोना व्हायरसचं थैमान सुरू झालं होतं तेव्हा डेटॉलचे सर्व प्रॉडक्ट संपले होते. 

कारण डेटॉल हे लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. पण याच नेहमीच वापरातील डेटॉलचा इतिहास तुम्हाला माहीत नसेल. आज आम्ही तुम्हाला याचा इतिहास सांगणार आहोत. साधारण 80 आणि 90 च्या दशकात डेटॉल अ‍ॅंटीसेप्टीक म्हणून पुरूषांच्या शेव्हिंग किटमध्ये ठेवलं जायचं. अजूनही ठेवलं जातं. तुरटीसोबत अनेक लोक याचा वापर करत होते. 

याच काळात जगभरात HIV/AIDS बाबत जागरूकता केली जात होती. त्यामुळे रेजर डेटॉलने धुण्याची प्रथा घरी आणि सलून मध्येही होत होती. डेटॉल घराघरात ओळखू जाऊ लागलं होतं. 

मात्र, नंतर बाजारात अनेक आफ्टरशेव लोशन आले आणि डेटॉल थोडं मागे पडलं. पण बाजारातून गायब झालं नाही. आजही अ‍ॅंटीसेप्टीक म्हणून भारतात याचाच वापर अधिक केला जातो. हेच कारण आहे कोरोनाच्या थैमानात सॅनिटायजरची मागणी वाढली तेव्हा डेटॉलचे प्रॉडक्ट ऑनलाइन आणि स्टोरमधून गायब झाले.

कधीपासून होतोय वापर?

Dettol च्या वेबसाईटवर त्यांच्या इतिहासाबाबत सांगितले आहे. त्यानुसार डेटॉलचा वापर भारतात गेल्या 80 वर्षांपासून केला जात आहे. भारतात याच्या वापराची सुरूवात 1933 मध्ये झाली होती. तेव्हापासून नंतर डेटॉल घराघरात दिसू लागलं.

206 वर्षांआधी झाली होती सुरूवात

डेटॉल हा एक ब्रिटीश ब्रॅन्ड आहे जो Reckitt Benckiser या कंपनीचा आहे. या कंपनीची सुरूवात साधारण 200 वर्षांआधी 1814 मध्ये झाली होती. अनेक अडचणींनंतर कंपनीने त्यांचे प्रॉडक्ट जगभरातील 200 देशांमध्ये विकणे सुरू केले होते. कंपनीकडून खासकरून Cleaning products, health care products आणि Nutrition प्रॉडक्ट तयार केले जातात.

 

डेटॉल अ‍ॅंटीसेप्टिकमध्ये chloroxylenol असतं जे सर्जिकल इन्फेक्शन आणि स्किन इन्फेक्शन रोखण्यासाठी फायदेशीर असतं. त्यासोबतच Dettol Antibacterial Surface Cleanse मधे benzalkonium chloride असतं. जे मुख्यपणे घराची स्वच्छता करण्यासाठी वापरलं जातं.

कोरोनानंतर पसरली होती अफवा

कोरोना महामारी पसरल्यावर डेटॉलबाबत एक अफवाही सोशल मीडियात पसरली होती. काही खोट्या मेसेजेसमध्ये असा दावा करण्यात आला होता की, डेटॉल अ‍ॅंटीसेप्टीक कोरोनाला रोखण्यासाठी मदत करतं. मात्र, त्यानंतर अनेक फॅक्टचेक स्टोरीतून हे नाकारण्यात आलं होतं.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेHealthआरोग्य