ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका कपलला डॉक्टरांनी सांगितलं होतं की, त्यांना कधीच अपत्य प्राप्ती होणार नाही. या कपलची मेडिकल कंडीशनही इतकी खराब होती की, त्यांना बाळ जन्माला घालू शकण्याची शक्यता आणखी कठिण होती. पण ५५ वर्षीय स्टीफन यांनी डाएटमध्ये एक बदल केला तर त्यांच्या घरात आनंदाची बातमी आली.
मोंटगोमेरीमध्ये राहणारे स्टीफन आणि त्यांची पत्नी रेचल ग्रीनवुड यांना डॉक्टर म्हणाले होते की, ते आयव्हीएफच्या माध्यमातूनही बाळाला जन्म देऊ शकत नाही. ४१ वर्षीय रेचलला पॉलिसिस्टीक ओवेरी सिंड्रोम आहे तर स्टीफनसोबत बालपणी एक अपघात झाला होता. ज्यामुळे त्यांचा स्पर्म काउंटही कमी होता.
या कपलला डॉ़क्टरांनी असं स्पष्टपणे सांगितल्याने ते नाराज होते. पण त्यांना जराही अंदाज नव्हता की, केवळ ब्रेड खाणं सोडून त्यांच्यासोबत एक चमत्कार होईल. त्यांच्या घरात बाळाच्या रडण्याचा आवाज येईल. स्टीफन यांना डायबिटीसची समस्या आहे. त्यामुळे त्यांना यीस्ट इन्फेक्शनही होत होतं. त्यामुळे त्यांचा स्पर्म काउंटही कमी होत होता. पण नंतर डाएटमधून सर्वप्रकारचे यीस्ट काढल्यावर त्यांचं इन्फेक्शन दोन आठवड्यात दूर झालं होतं. स्टीफनने आरोग्यासाठी ब्रेड आणि पेस्ट्रीज खाणं पूर्णपणे बंद केलं होतं.
स्टीफनने ब्रेड आणि पेस्ट्रीज खाणं बंद केल्यावर ५ महिन्यांनी रेचलने सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे. गेल्या दोन दशकापासून बाळासाठी प्रयत्न करत असलेल्या या कपलच्या घरात अखेर १ जुलैला बाळाचा जन्म झाला. स्टीफनने याबाबत सांगितलं की, मी फार जास्त आनंदी आहे आणि इमोशनलही. आम्ही अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट बघत होतो.
ते पुढे म्हणाले की, मी एक रिटायर्ड पोलीस आहे आणि मी हा विचार करून फार आनंदी आहे की, मी माझा वेळ माझ्या बाळासोबत घालवू शकतो. हे फीलिंग माझ्यासाठी खास आहे. मला लोकांना हेच सांगायचं आहे की, त्यांनी आशा सोडू नये. ब्रेड सोडल्यावर केवळ ५ महिन्यात आमच्या घरात आनंद आला.