जग हे वेगवेगळ्या विचित्र वस्तूंनी गजबजलेलं आहे. अशा अनेक वस्तूंचा शोध लागल्यावर किंवा सापडल्यावर अनेक आश्चर्याचे धक्के बसले आहेत. अशीच एक विचित्र वस्तू ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये एका तरूणाला सापडली. या वस्तूमुळे १८.५ कोटी वर्षांपूर्वीची अनेक गुपिते उघड झाली आहे. या वस्तुमुळे समोर आलेल्या गोष्टींनी स्वत: संशोधकही हैराण झाले आहेत.
वेगवेगळ्या जीवांचा शोध घेणारा २२ वर्षीय एरोन स्मिथ एक दिवस समुद्र किनाऱ्यावर काही वेगळ्या जीवांचा शोध घेत होता. तेव्हा अचानक त्याला एक जुना तोफगोळा सापडला. हा तोफगोळा एका अजब चमकदार दगडात रूपांतरित झाला होता. हा बघायला सोन्यासारखाच दिसत होता. जेव्हा एरोनने हा तोफगोळा तोडून आत बघितलं तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
या तोफगोळ्याच्या आत त्याला एक दुर्मिळ जीवाश्म मिळाला. असे सांगितले जात आहे की, हा जीवाश्म समुद्री जीव क्लेवीसेरमचा आहे. हा जीव १८.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर होता. पण आता पूर्णपणे नष्ट झाला आहे. क्लेवीसेरम एक महाकाय जीव होते, जे बघायला एखाद्या ऑक्टोपससारखे होते.
एरोनने सांगितले की, तोफगोळा सोन्यासारखाच दिसत होता. ज्यावर एक टणक परत होती आणि त्यामुळे तो चमकत होता. संशोधकांनुसार, या क्लेवीसेरस जीवांवर कठोर कवच नसायचं. त्यामुळेच यांचे जीवाश्म पृथ्वीवर फारच कमी आढळलेत.
एरोनने त्याच्या या शोधाचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या शोधा संशोधकांनी मोठा शोध म्हटलं आहे. ते म्हणाले की, असे जीवाश्म लाखांमधून एखाद्यालाच मिळतात. यातून शोधासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच यातून मागील कित्येक वर्षांपूर्वीचा इतिहास जाणून घेता येणार आहे.