बांदा : ऐनवेळी शर्टचे बटन तुटून पडते आणि मग आपण त्या ठिकाणी पिन लावतो किंवा अन्य काही पर्याय शोधतो, पण उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील या विद्यार्थ्याची करामत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहाणार नाही. त्याचे झाले असे की, मोगरिया गावात राहाणारा शत्रुघ्न निषाद नावाचा हा मुलगा शाळेत जाण्यासाठी निघाला खरा, पण शर्टचे एक बटन तुटल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याच्याकडे शाळेचा एकच ड्रेस आहे. ऐन वेळी बटनही सापडत नव्हते. काय करावे या विचारातच त्याने घरातील एक छोटे कुलूप घेतले आणि तुटलेल्या बटनाच्या जागेवर लावले. शाळेत गेल्यावर शिक्षकापासून मित्रांपर्यंत सर्वच जण त्याच्याकडे पाहू लागले. काही शिक्षकांनी त्याचे फोटो काढले. एव्हाना हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या विद्यार्थ्याने शर्टला लावले कुलूप
By admin | Published: April 18, 2017 12:41 AM