जर तुमच्या पायांची साइज मोठी असेल, म्हणजे पायांचे पंजे मोठे असतील तर तुमची पार्टनर तुमच्या शंका घेऊ शकते. कारण एका सर्व्हेतून समोर आलं आहे की, मोठे पाय असलेले पुरूष लहान पाय असलेल्या पुरूषांच्या तुलनेत जास्त दगा देतात. सर्व्हेनुसार, ज्या पुरूषांच्या पायांची साइज १० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ते त्यांच्या पार्टनरला दगा देण्याची शक्यता अधिक असते असा दावा या सर्व्हेत केला आहे. याउलट सात किंवा त्यापेक्षा कमी साइज असलेल्या पुरूषांमध्ये ही शक्यता कमी असते.
२ हजार पुरूषांवर सर्व्हे
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणातून पुरूषांच्या अफेअरकडे त्यांच्या पायांना जोडून पाहिलं गेलं. यादरम्यान समोर आलं की, मोठे पाय असलेले पुरूष आपल्या पार्टनरला दगा देऊन दुसऱ्यासोबत अफेअर ठेवण्याची शक्यता अधिक राहू शकते. डेटींग साइट ‘Illicit Encounters’ ने आपल्या या सर्व्हेत साधारण २ हजार पुरूषांशी संवाद साधला. यात मोठे पाय असलेल्या जास्तीत जास्त पुरूषांनी हे मान्य केलं की, त्यांचं अफेअर सुरू आहे.
वेबसाइटची प्रवक्ता जेसिका लिओनी म्हणाली की, पुरूषांच्या पायांच्या साइजच्या आधारावर हे समजून घेतलं जाऊ शकतं की, त्यांची दगा देण्याची शक्यता किती आहे. उदाहरण द्यायचं तर ज्या पुरूषांच्या पायांची साइज ११ आहे त्यांनी दगा देण्याची शक्यता २९ टक्के राहते. तर १० साइजवाल्यांची २५ टक्के, १२ वाल्यांची २२ टक्के शक्यता असते.
या कारणामुळे जास्त शक्यता
जेसिका लिओनीने सांगितलं की, 'मोठे पाय असलेल्या पुरूषांची लांबी अपेक्षाकृत असते. अशात ते दुसऱ्या महिलांकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांचे अफेअरही जास्त असतात. ते म्हणाले की, साइज १० आणि वरच्या साइज असलेल्या पुरूषांची अफेअर असण्याची शक्यता जास्त आहे. सर्व्हेतून आढळलं की, ज्या लोकांच्या पायांची साइज १० पेक्षा कमी होती, त्यांनी त्यांच्या पार्टनरला दगा न दिल्याचं सांगितलं. तर मोठ्या साइज असलेल्या पुरूषांनी हे मान्य केलं की त्यांनी वैवाहिक असूनही अफेअर केले.
Tiger Woods ने दिला दगा
सर्व्हेतील परिणाम टाइगर वुड्स, ह्यूग ग्रांट, लॅमर ओडोम आणि अर्नोल्ड श्वार्ज़नेगर सारखे सेलिब्रिटीजना बघून योग्य वाटतो. कारण या सर्वच लोकांच्या पायांची साइज १० किंवा त्यापेक्षा जास्त आहे. या सर्वांनीच त्यांच्या पार्टनरला दगा दिल्याची माहिती आहे. जेसिका म्हणाली की, या सर्व्हेतील दाव्यावर भलेही लोक प्रश्न उपस्थित करतील, पण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. सर्व्हेत सहभागी अनेक लोाकांनी हे मान्य केलं की, वैवाहिक असूनही त्यांचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध होते.