ज्याप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, जर पृथ्वी नष्ट झाली तर कसं होईल? नेहमीच वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात ज्यात एक्सपर्ट त्यांच्या अभ्यासानुसार पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होणार हे सांगत असतात. कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल.
पण नुकताच याबाबत एक अभ्यास समोर आला ज्यावर विश्वास तर बसणार नाही, पण सोबतच हसूही येईल. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, मुळात केवळ मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही. याची कारणेही हैराण करणारी आहेत.
एक्सपर्ट्सनुसार, दोनशे वर्षात इतकी दुर्गंधी असेल की, इथे श्वास घेणंही अशक्य होईल. ही दुर्गंधी मनुष्यांची ढेकर आणि पादण्यातून पसरेल. वयोवृद्ध लोक इतका गॅस सोडतील की, पृथ्वीवर मीथने आणि नायट्रस ऑक्साइड सगळीकडे पसरेल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढेल. सोबतच लोकांना श्वास घेण्यास फार जास्त समस्या होईल.
एक्सपर्ट्सनुसार, जगात पुढील 200 वर्षात ग्लोबल वार्मिंगची समस्या खूप जास्त वाढेल. समुद्राचं पाणीही वाफ होईल. तसेच पृथ्वीचं तापमान खूप जास्त वाढेल. इतक्या उष्णतेमुळे जगात लोकांना राहणं अवघड होईल. अशात पृथ्वीची अवस्था वीनस ग्रहासारखी होईल, जिथे मनुष्यांचं राहणं अशक्य आहे.