स्वेज कालव्यात चीनमधून माल घेऊन जाणारं एक विशाल कंटेनर जहाज एवरगिवेन अडकल्याने भीषण ट्रॅफिक जॅम झालं आहे. असे सांगितले जात आहे की, या कंटेनर जहाजावर पनामाचा झेंडा लागला आहे. १९३.३ किलोमीटर लांब स्वेज कालवा भूमध्य सागराला लाल सागराशी जोडतो.
असे सांगितले जात आहे की, मंगळवारी सकाळी स्वेज पोर्टच्या उत्तरेला कालवा पार करताना कंट्रोल सुटल्याने ४०० मीटर लांब आणि ५९ मीटर रूंद कंटेनर जहाज फसलं. आता हे जहाज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात टग बोट्स(जहाजांना धक्का देणाऱ्या बोट्स) तैनात केल्या आहेत. तरी हे जहाज तिथून काढण्यासाठी काही दिवस लागू शकतात.
समुद्रात भयंकर ट्रॅफिक जाम
हे जहाज मधेच अडकल्याने लाल सागर आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जहाजांचा जाम लागलाय. या कालव्याच्या माध्यमातूनच रोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठे जहाज यूरोप ते आशिया आणि आशिया ते यूरोप प्रवास करतात. जर हा रस्ता जास्त वेळ बंद राहिला तर समुद्री जहाजांना पूर्ण आफ्रिका महाद्वीपाला फेरा मारून यूरोपपर्यंत पोहोचावं लागेल.
चीनहून नेदरलॅंडला जात होतं जहाज
पनामाचं हे जहाज चीनमधून माल घेतल्यानंतर नेदरलॅंड पोर्ट रॉटरडॅमसाठी जात होतं. यादरम्यान त्याने हिंद महासागरातून यूरोप जाण्यासाठी स्वेज कालव्याचा मार्ग निवडला. तेव्हाच हे जहाज इथे अडकलं. हे जहाज २०१८ मध्ये तयार करण्यात आलं होतं.
कसं फसलं जहाज?
रिपोर्टनुसार, एवरगिवेन्या चालक दलाने सांगितले की, स्वेज कालवा पार करताना आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे जहाज पूर्णपणे फिरलं. नंतर जेव्हा त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते कालव्यात आडवं अडकलं. त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक बंद झालं. या जहाजाच्या मागे आणखी एक मालवाहक जहाज द मेर्सक डेनवर फसलेलं आहे.