वॉशिंग्टन : अमेरिकी नागरिक हेंज व्हिटली हिने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये मिन्सोटा येथे नवा बंगला खरेदी केला होता. या बंगल्यासाठी तिने जवळपास दीड कोटी रुपये खर्च केले; मात्र तेथे राहण्यास गेल्यानंतर पहिल्याच दिवशी बेडरूममध्ये तिला अशी गोष्ट दिसली की, ती थक्क झाली. सिंगल मदर असलेल्या व्हिटलीने आयुष्यभर पै पै जमा करून हा ३ बीएचके बंगला खरेदी केला होता. तेथे राहण्यास आल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना त्यांच्या खोलीत साप दिसला. त्यामुळे त्यांची घाबरगुंडी उडाली, यानंतरची गोष्ट ऐकून तुम्हालाही भीती वाटेल. पुढे दररोज घरात साप निघू लागले. त्यामुळे व्हिटली यांनी सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्रांनी घरात ९५ आणि घराच्या बाहेर शेकडो साप पकडले. व्हिटलीच्या घराजवळ दलदल आहे. पाणी आणि उष्णता यांच्या संगमामुळे सापांसाठी हे ठिकाण पोषक आहे. त्यामुळेच या बंगल्याच्या आसपास एवढ्या प्रचंड प्रमाणात साप असतात. घरातील साप काढण्यासाठी व्हिटलीने आतापर्यंत ८ लाख ३३ हजार रुपये खर्च केले आहेत. ज्यांच्याकडून आपण घर घेतले त्यांना ही बाब ठावूक होती; परंतु त्यांनी ती लपवून ठेवली. त्यामुळे आपण त्यांच्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार करणार असल्याचे व्हिटलीने सांगितले.
दोन कोटींत घेतलेले घर निघाले सर्पालय
By admin | Published: May 07, 2017 1:00 AM