मॉस्को - बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे. मात्र तिच्याआधीही अनेक प्रख्यात व्यक्तींनी सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व मिळवलं आहे. दरम्यान, एका अब्जाधीशाच्या पत्नीने सरोगसीच्या माध्यमातून २२ मुलांना जन्म दिला आहे. त्यातील २१ मुलांना तर तिने एका वर्षभरातच जन्म दिला आहे. तिच्या इन्स्टाग्रामच्या बायोवरही त्याचा उल्लेख आहे. आता सरोगसीच्या माध्यमातून १०५ मुलांना जन्म देण्याचे लक्ष्य या महिलेने समोर ठेवले आहे.
या महिलेचे नाव क्रिस्टिना ओजतुर्क असे आहे. या महिलेचे वय २४ वर्षे आहे. ती रशियाची राजधानी मॉस्कोमधील रहिवासी आहे. तिने वर्षभरामध्येच २१ मुलांना सरोगसीमधून जन्म दिला. तसेच हल्लीच तिने अजून एका मुलाला जन्म दिला आहे. एकूण २२ मुलांना तिने सरोगसीमधून जन्म दिला.
डेली मेलने या महिलेबाबत विसृत माहिती गतवर्षी प्रकाशित केली होती. या महिलेने आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी १६ आयांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यावर वर्षभरासाठी तब्बल ६८ लाख रुपये खर्च होतो. क्रिस्टिना हिचे ५७ वर्षीय पती गलिप ओजतुर्क हे पेशाने एक हॉटेल व्यावसायिक आहेत. दोघेही एकमेकांना भेटले होते. आता क्रिस्टिना हिने सरोगसीच्या मदतीने १०५ मुलांना जन्म देण्याचे लक्ष्य समोर ठेवलं आहे. या महिलेने पहिल्या बाळाला १० मार्च २०२० मध्ये जन्म दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत तिने २२ बाळांना जन्म दिला आहे.
मार्च २०२० ते जुलै २०२१ या काळात या जोडप्याने सगोगसीवर तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये खर्च झाले आहेत. तसेच मुलांचा सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या आयांवरही सुमारे ६८ लाख रुपये खर्च झाला आहे. मुलांचे डायपर आणि अन्य बाबींवर क्रिस्टिना आठवड्याला सुमारे ४ लाख रुपये खर्च करते.