तुम्ही अनेकदा काही लोकांना म्हणताना ऐकलं असेल की, त्यांना बाथरूममध्ये नवनवीन आयडिया येतात आणि त्यांना बाथरूममध्ये जास्त शांतता मिळते. जर तुम्हालाही असं वाटत असेल की, बाथरूममध्ये सगळ्यात जास्त शांतता किंवा आराम मिळतो तर तुम्ही बरोबर आहात. कारण एका सर्व्हेतूनही हे सिद्ध झालं आहे. हा दावा इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून करण्यात आला आहे. हा सर्व्हे बाथरूमवर करण्यात आला.
याआधी तुम्ही कधी विचार केला का की, एक सामान्य माणूस त्याच्या आयुष्यातील किती वेळ टॉयलेट किंवा बाथरूममध्ये घालवतो? या प्रश्नाचं उत्तर या सर्व्हेमधून समोर आलं की, एका सामान्य माणूस त्याच्या आयुष्यातील सरासरी ४१६ दिवस बाथरूममध्ये घालवतो.
studyfinds.org ने दिलेल्या वृत्तानुसार, हा सर्व्हे U.K. home-goods outlet B&Q कडून करण्यात आला आहे. यात साधारण २ हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. या सर्व्हेचा उद्देश लोकांना एक बेस्ट बाथरूम तयार करून देणे हा होता. यानुसार, पुरूष ३७३ दिवस म्हणजे दिवसाला २३ मिनिटे आणि महिला ४५६ दिवस म्हणजे दिवसातील २९ मिनिटे बाथरूममध्ये घालवतात.
बाथरूमबाबत विचित्र खुलासा
हैराण करणारी बाब ही आहे की, ज्या लोकांकडे पर्सनल बाथरूम असतं ते लोक त्यांचं बाथरूम इतरांसोबत शेअर करत नाहीत. त्यानुसार १० पैकी ७ लोक हे त्यांचं बाथरूम दुसऱ्यांसोबत शेअर केल्यावर निराश होतात. सर्व्हेमध्ये सहभागी १७ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, ते त्यांच्या बाथरूममध्ये दुसऱ्यांना बघू शकत नाहीत.
टॉयलेट पेपर संपल्यावर येतो राग
बाथरूमध्ये लोकांना सर्वात जास्त कशाचा राग येतो? एक तृतियांश लोकांनी हे सांगितले की, टॉयलेट पेपर संपल्यावर त्यांना फार राग येतो. तर २०० लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना बाथरूमच्या नालीत केस दिसल्यास राग येतो. तर २९ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांचे बॉयफ्रेन्ड किंवा पती बाथरूम घाणेरडं करण्याला जबाबदार आहेत. याचा त्यांना राग येतो.
या सर्व्हेतून आणखी एका आश्चर्यकारक बाब समोर आली. ती म्हणजे, काही लोक बाथरूमचा वापर एस्केप(पळवाट) रूम म्हणूनही करतात. जेव्हा त्यांना कुणाला टाळायचं असतं तेव्हा ते बाथरूममध्ये जाऊन लपतात. ६ पैकी एका व्यक्तीने सांगितले की, असं करून त्यांना फार जास्त शांती मिळते.
बाथरूममध्ये आयुष्यातील सर्वात चांगले क्षण
या सर्व्हेतून आणखी आश्चर्यकारक बाब समोर आली. ती म्हणजे काही लोकांनी हे मान्य केले की, त्यांनी या छोट्याशा रूमममध्ये त्यांच्या जीवनातील काही सर्वात चांगले क्षण अनुभवले. १० टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना स्वत:शी बोलण्याची संधी मिळाली. तर १० टक्के लोक म्हणाले की, इथे त्यांनी लोकांशी वाद घातला. ८ टक्के लोक म्हणाले की, त्यांनी त्यांच्या पार्टनरसोबत इथे वेळ चांगला वेळ घालवला. तसेच १.४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला.
आता या सर्व्हेतून हे दिसून येतं की, लोकांचं त्यांच्या बाथरूमवर किती प्रेम आहे. सोबतच ५१ टक्के लोकांचं असं मत आहे की, त्यांना बाथरूमला रिनोवेट करून फार आनंद मिळतो. याने घरातही आनंदाचं वातावरण राहतं.
खरंतर भारतातही असा एखादा सर्व्हे व्हावा आणि इथल्या लोकांना बाथरूमबाबत काय वाटतं किंवा बाथरूमवर त्यांचं कितीत प्रेम आहे हे जाणून घेता यावं.