ज्यूरिच : एखाद्या सलूनमध्ये जाऊन हेअरकट करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतात? भारताबद्दलच बोलायचे झाले तर कोणत्याही मोठ्या शहरात हे काम १०० रुपयांच्या आत होऊ शकते; पण हेअरकटसाठी कोणी ४००० रुपये मोजत असेल, तर विश्वास बसणार नाही. मात्र, स्वित्झर्लंडमधील हे वास्तव आहे. येथे हेअरकटसाठी अगोदर खिशाला कात्री मारावी लागते. हेअरकटच्या बाबतीत जगातील ४७ महागड्या शहरात ज्यूरिच सर्वांत महागडे तर दिल्ली सर्वांत स्वस्त आहे. दिल्लीत हेअरकटसाठी २०० रुपये मोजावे लागतात. एका संस्थेने विविध शहरांतील वेगवेगळ्या सेवांचे दर जमा केले आहेत. यात हेअरकटचाही समावेश आहे. सुविधांच्या तुलनेत हे दर कमी अधिक असू शकतात. जगातील वेगवेगळ्या भागातील ४७ प्रमुख शहरांचा यात समावेश आहे. यातील सर्वांत स्वस्त तीन शहर भारतातील आहेत. नॉर्वेतील ओस्लोमध्ये हेअरकटचे दर जगातील सर्वांत महागड्या दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. हेअरकटसाठी येथे ३१२० रुपये लागतात.
स्वित्झर्लंडमध्ये हेअरकटसाठी लागतात चार हजार रुपये
By admin | Published: May 26, 2017 1:04 AM