सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडता लोकांना बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे अनेक कामगारांचे हाल होत आहेत. त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशात समाजातील काही लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. यात फक्त पुरूषच नाही तर महिलांचा सुद्धा समावेश आहे.
सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू असल्यामुळे जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी मदत करायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतमजूराने हज ला जाण्यासाठी जमा केलेल्या पैश्यातून गरीबांना अन्नाचे वाटप केले. अशीच एक घटना सिरियामधूनसुद्धा समोर येत आहे. या ठिकाणी विधवा महिला स्वतः जेवण तयार करून गरीबांना वाटप करत आहेत.
न्यूज एजंसी एएफपीने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत या वुमन किचन डायरेक्टरच्या प्रमुख या सांगतात की, जेवण बनवत असलेल्या महिला या विधवा असून त्यांचा मुळ उद्देश रमजानच्या महिन्यात गोरगरीबापर्यंत अन्न पोहोचवण्याचा आहे.
या महिला जेवण तयार करून गोरगरीबांना आणि त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिला मास्क आणि ग्लोव्हज घालून जेवण बनवत आहेत. (हे पण वाचा-जुळ्या मुलांची राजधानी असलेल्या 'या' प्रदेशाबद्दल माहीत आहे का?)
जेवण तयार झाल्यानंतर कारमध्ये ठेवून वेगवेगळया भागात पाठवलं जातं. याशिवाय या महिलांचे जेवण तयार करून झाल्यानंतर काही वॉलेंटिअर्स जेवणाचं वाटप करण्यासाठी मदत करतात. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून सिरियात युध्दजन्य परिस्थिती आहे.
यूएनएच्यामते सिरियातील ८० टक्के जनता ही गरीबीच्या, दारिद्र्याच्या परिस्थितीचा सामना करत आहे. गरजू लोकांना अन्नदानाचं काम करत असेलेल्या या विधवा महिलांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. (हे पण वाचा- ५ मीटर कापडाने केली सुरुवात, मास्क शिवणाऱ्या आजीबाईला शेजाऱ्यांकडून मदतीचा हात)