हे सर्वांनाच माहीत आहे की, कुत्रा हा जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी मानला जातो. त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण ऐकत असतो. अनेकांना तर त्यांच्या कुत्र्यामुळे नवजीवन मिळालं आहे. अशीच एक घटना तायवानमधून समोर आली आहे. येथील एक महिला चीनच्या वुहान प्रांतात जाण्याची तयार करत होती. इथेच कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका बसलाय. पण तिच्या कुत्र्याने असं काही केलं की, ती प्रवासाला जाऊच शकली नाही. मात्र, तिचा जीव वाचला.
झालं असं की, ती प्रवासाला निघण्याच्या काही वेळाआधी तिच्या पाळीव कुत्र्याने तिच्या पासपोर्टच्या फाडून खाल्ला. त्यामुळे तिला तिचा दौरा रद्द करावा लागला. वुहानमध्ये कोरोना व्हायरसच्या थैमानाची बातमी वाचल्यावर या महिलेने फेसबुकवर तिच्या फाडलेल्या पासपोर्टसोबत कुत्र्याचा फोटो शेअर करत त्याचे धन्यवाद मानले.
वुहान येथे कोरोना व्हायरसने डोकं वर काढल्याने हे शहर पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. इथे 80 लोकांचा कोरोना व्हायरसने जीवने जीव घेतला. या महिलेने फेसबुकवर कुत्र्याचा फोटो शेअर करत त्याचे धन्यवाद मानले. तसेच मी नशीबवान असल्याचे म्हटले.
माझ्या कुत्र्याने माझा जीव वाचवला. जसा माझा पासपोर्ट फाटला तसा वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरू लागला. याबाबत मी आता विचार करतो तेव्हा असं मला वाटतं की, माझ्या कुत्र्याने माझी सुरक्षा केली, असं ही महिला म्हणाली.