शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
2
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
3
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
4
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
5
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
6
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
7
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
8
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
9
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
10
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
11
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
12
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
13
'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO
14
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
15
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
16
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
17
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
18
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
19
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
20
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा

बाळाला सांभाळा, तरच मूल जन्माला घालू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 8:12 AM

त्यंत उच्च दर्जाचं जीवनमान असलेला हा एक प्रगत देश! अर्थातच महिला-पुरुष समानतेबाबतही हा देश अग्रेसर आहे. याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जर्मनीत महिला-पुरुष लिंग गुणोत्तरही जगाच्या डोळ्यांत अंजन घालणारं आहे.

जर्मनी हा जगातील एक पुढारलेला देश. अनेक बाबतीत या देशानं जगापुढे मानदंड ठेवले आहेत. केवळ युरोपातीलच नाही, तर जगातीलही एक बलाढ्य अर्थसत्ता म्हणून जर्मनीचा सन्मानानं उल्लेख केला जातो. औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तर जागतिक नेता म्हणून जर्मनीनं कित्येक वर्षापासून आपला लौकिक कायम राखला आहे. अत्यंत उच्च दर्जाचं जीवनमान असलेला हा एक प्रगत देश! अर्थातच महिला-पुरुष समानतेबाबतही हा देश अग्रेसर आहे. याचंच एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जर्मनीत महिला-पुरुष लिंग गुणोत्तरही जगाच्या डोळ्यांत अंजन घालणारं आहे. जर्मनीत गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. जर्मनीत महिलांची संख्या आहे सुमारे ४१ दशलक्ष. पुरुषांची संख्या मात्र महिलांपेक्षा तब्बल वीस लाखांनी कमी आहे. 

नुकत्याच झालेल्या पाहणीतही जर्मनीत शंभर महिलांमागे पुरुषांची संख्या केवळ ९७.५ इतकीच आहे. जर्मनीचं मोठेपण इथेच संपत नाही. जगात बहुसंख्य ठिकाणी महिलांचं सरासरी आयुर्मान कमी असताना, जर्मनीनं इथेही पुरुषांवर मात केली आहे. जर्मनीत पुरुषांचं सरासरी आयुर्मान ७८.३ वर्षे आहे, तर महिला मात्र सरासरी ८३.२ वर्षे जगतात.. संसदेतही महिलांचं प्रतिनिधित्व उत्तम आहे. पुरुषांच्या तुलनेत इथे महिला तब्बल चारपट जास्त पार्टटाइम नोकरी करतात.. कोरोना काळाच्या आधी ६२ टक्के महिला बालसंगोपनात व्यस्त होत्या, पण कोरोना सुरु होताच, पुरुषांनीही त्यात आपला सहभाग वाढवला आणि बालसंगोपनातील त्यांची संख्या पाच टक्क्यांवरुन १३ टक्क्यांपर्यंत गेली, तर महिलांची टक्केवारी ५३ टक्क्यांपर्यंत कमी झाली. त्यामुळे त्यांना थोडी उसंत मिळाली. सगळ्यांना वाटेल, की अरे वा, इथे सगळं काही आलबेल आहे. महिलांच्या बाबतीत हा देश फारच उदार दिसतोय.. पण तरीही काही बाबतीत इथेही पुरुषप्रधान मानसिकतेची मक्तेदारी आहे, आणि त्याविरुद्ध महिलांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. महिला दिनानिमित्त तर हा आवाज आणखीच बुलंद झाला.. याचं कारण आहे, घराची, मुलाबाळांची जबाबदारी इथे अजूनही महिलांवरच आहे. करिअर आणि जबाबदाऱ्यांपोटी महिला जाणीवपूर्वक पाळणा लांबवण्याचा प्रयत्न करतात. सरासरी तिसाव्या वर्षी महिला आपल्या बाळाला जन्म देतात. बालसंगोपनात पुरुषांनी नेहमीच हात वर केला आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना आपलं करिअर कायम दुय्यम ठेवावं लागतं. म्हणूनच महिलांनी आता आपला आवाज बुलंद करताना पुरुषांना अनेक सवाल केले आहेत.. 

मूल आमचं एकट्याचं आहे का? मुलांचं संगोपन आम्ही एकट्यानंच काय म्हणून करावं? तुमची जबाबदारी तुम्ही केव्हा उचलणार? मुलांसाठी आमच्या करिअरवर पाणी आम्ही एकट्यानंच का म्हणून सोडावं?.. काही महिलांनी तर याच्याहीपुढे जाऊन पुरुषांना जाब विचारला आहे, मुलांची किमान समसमान जबाबदारी घेणार असाल, तरच आता यापुढे आम्ही मूल जन्माला घालू..

जर्मनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी, त्यातल्या बहुसंख्य महिला अर्धवेळ नोकरी करतात, यामागची मेखही मुलं, कुटुंब हेच आहे. कारण मुलांना वाढवताना त्यांना पूर्ण वेळ नोकरी करताच येत नाही आणि आपल्या करिअरमध्ये अग्रस्थानीही जाता येत नाही. कोरोना काळात अनेक पुरुष घरी होते, म्हणून त्यांनी ‘नाईलाजानं’ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचलली, पण काेरोनाची घरघर कमी होताच, पुरुष पुन्हा आपल्या मूळ प्रवृत्तीवर गेले. पुरुषांची बालसंगोपनाची टक्केवारी थोड्याच दिवसात तब्बल सात टक्क्यांनी खाली घसरली.कुटुंब, मूल आणि घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना जर्मनीमधील महिलांना नेहमीच आपल्या करिअरवर पाणी सोडावं लागलं आहे. याबाबतीत कोणत्याही देशापेक्षा इथल्या महिलांमध्ये वेगळेपण दिसत नाही. मात्र हेच आता इथल्या महिलांना मान्य नाही आणि त्याविरुद्ध त्यांनी जाहीरपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.

जगात सर्वत्र महिलांमध्ये आणखी एका बाबतीत जो दुजाभाव केला जातो, तो इथेही दिसतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना मिळणारं वेतन तुटपुंजे आहे. काम सारखंच, किंबहुना बऱ्याचदा जास्त, पण पुरुषांपेक्षा वेतन कमी, या असमानतेला महिलांना वर्षानुवर्षांपासून सामोरं जावं लागतं आहे. हा अन्याय आता आम्ही सहन करणार नाही, असंही महिलांनी बजावलं आहे. निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या पेन्शनबाबतही हाच तरतम भाव महिलांबाबत बाळगला जातो. निवृत्तीनंतर पुरुषांपेक्षा तब्बल ४९ टक्के कमी पेन्शन महिलांना दिलं जातं.. अलीकडच्या काळात यात थोडाफार बदल दिसू लागला असला, मोठ्या, महत्त्वाच्या पदांवर महिलांची संख्या वाढत असली, तरी मुलं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा त्यांना माघार घ्यावी लागते..

महिला ‘बॉस’, पगार मात्र कमीच! जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या जवळपास दोनशे कंपन्या आहेत. त्यात उच्च पदांवर केवळ ११ टक्के महिला आहेत. गेल्या वर्षीच झालेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, की या पदांवरील महिलांनाही पुरुषांपेक्षा कमी पगारावर काम करावं लागतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना तब्बल १८.३ टक्के कमी पगार मिळतो.

टॅग्स :Germanyजर्मनी